Agriculture Award Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Award : वसंतराव नाईक गौरव पुरस्कारासाठी पाठवा प्रस्ताव

Agriculture Department : विदर्भ, मराठवाडा, पश्‍चिम महाराष्ट्र, खानदेश व कोकण अशा विभागांतून विभागनिहाय शेतकऱ्यांनी आपल्या शेतीत विविध प्रयोग करून विक्रमी उत्पादन आणि अधिक नफा प्राप्त केला असल्यास आपला जीवनालेख (बायोडाटा) पाठवावा.

Team Agrowon

Yavatmal : माजी मुख्यमंत्री, हरितक्रांतीचे प्रणेते कै. वसंतराव नाईक यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांच्या स्मृतिदिनी पुसदच्या वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी १८ ऑगस्ट रोजी विक्रमी उत्पादन घेणाऱ्या निवडक कर्तबगार शेतकऱ्यांचा तसेच कृषी शास्त्रज्ञांचा सन्मान करण्यात येतो. यानिमित्त वसंतराव नाईक गौरव पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

विदर्भ, मराठवाडा, पश्‍चिम महाराष्ट्र, खानदेश व कोकण अशा विभागांतून विभागनिहाय शेतकऱ्यांनी आपल्या शेतीत विविध प्रयोग करून विक्रमी उत्पादन आणि अधिक नफा प्राप्त केला असल्यास आपला जीवनालेख (बायोडाटा) पाठवावा.

त्यामध्ये खर्च किती, उत्पादन (टनामध्ये) किती व बाजारपेठेत विक्री केल्यानंतर किती निव्वळ नफा झाला याची सविस्तर माहिती द्यावी. यंदा कृषी शास्त्रज्ञांकरिता ‘उसाचे उत्पादन वाढण्याकरिता केलेल्या विशेष संशोधन कार्याबद्दल’ हा विषय निवडला आहे. यासंबंधी विशेष संशोधनात्मक कार्य केलेल्या शास्त्रज्ञांनी त्यांचा जीवनालेख आवश्यक कागदपत्रांसह सादर करावा.

याशिवाय कृषिविषयक आणि कृषी संलग्न क्षेत्रामध्ये केलेल्या विशेष कार्याबद्दल पुरस्कार- यावरील विषयावर कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांसह, उत्पादक कंपनी, सामूहिक शेती गटांनी देखील सविस्तर माहितीसह प्रस्ताव पाठवावा. आपले प्रस्ताव दोन पासपोर्ट साइज छायाचित्रांसह १० जुलैपर्यंत पोहोचतील, असे नियोजन करावे, असे आवाहन प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे.

पत्रव्यवहाराचा पत्ता : अध्यक्ष, वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठान, श्रीमती वत्सलाबाई नाईक महिला महाविद्यालयासमोर, पुसद- ४४५२०४, जि. यवतमाळ. ई-मेल :vppusad@gmail.com

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Payments Pending: ऊस बिले द्या, अन्यथा जलसमाधि

Farmer Loan Waiver : २०१७ आणि २०१९ च्या कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी निर्णय

Drinking Water Storage: तेरा प्रकल्पांतील साठा पिण्यासाठी आरक्षित

Tur Seeds Procurement: तेलंगणातील शेतकरी तूरीच्या बियाणे खरेदीसाठी करमाळ्यात

Agrowon Podcast: आल्याचा भाव टिकून; सोयाबीन टिकून, गहू आवक घटली, तर कापूस व कारले स्थिरावले

SCROLL FOR NEXT