Banana Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Banana Export Workshop: निर्यातक्षम केळीबाबत वसईत शनिवारी परिसंवाद

Farmer Workshop: वसई, वाडा, तलासरी, पालघर, वानगाव, मोघाडा आणि परिसरात पडीक जमिनीवर निर्यातक्षम केळी लागवडीसाठी सुख संपत्ती संवर्धन सहकारी सोसायटी आणि जॉन आल्मेडा प्रतिष्ठानच्या वतीने शनिवारी (ता. २) कार्यशाळेचे आयोजन केले आहे.

बाळासाहेब पाटील

Mumbai News: वसई, वाडा, तलासरी, पालघर, वानगाव, मोघाडा आणि परिसरात पडीक जमिनीवर निर्यातक्षम केळी लागवडीसाठी सुख संपत्ती संवर्धन सहकारी सोसायटी आणि जॉन आल्मेडा प्रतिष्ठानच्या वतीने शनिवारी (ता. २) कार्यशाळेचे आयोजन केले आहे.

केळीसाठी प्रसिद्ध असलेल्या वसई परिसरात बनाना बंची टॉप रोगामुळे उत्पादन कमी झाल्याने शेतकरी अन्य पिकांकडे वळला आहे. त्यामुळे केळीसाठी पोषक वातावरण असलेल्या परिसरातील शेतकऱ्यांच्या पडीक जागेवर लागवडीसाठी जैन इरिगेशनचे सहकार्य घेण्यात येणार आहे.

त्या अनुषंगाने निर्यातक्षम केळी लागवड व्हावी या दृष्टीने सुख संपत्ती संवर्धन सहकारी सोसायटी आणि जॉन आल्मेडा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (ता. २) सहजीवन हॉल, मर्सेस, वसई येथे केळी परिसंवादाचे आयोजन केले आहे. आंतरराष्ट्रीय केळी तज्ज्ञ तथा जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष डॉक्टर के. बी. पाटील मार्गदर्शन करणार आहेत.

वसई आणि परिसरात बऱ्याचशा जमिनी पडीक आहेत, त्यातून उत्पन्न घेतले जात नाही. तेथे केळी लागवड करून शेतकऱ्यांना चांगले वार्षिक उत्पन्न घेणे शक्य आहे. एकरी पाच लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न केळी लागवडीने मिळू शकते.

या केळीच्या तंत्रशुद्ध पद्धती, लागवड कशी करावी, निर्यात आदींबाबत या परिसंवादात मार्गदर्शन केले जाणार आहे. तरी शेतकऱ्यांनी या परिसंवादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सुख संपत्ती संवर्धन सहकारी सोसायटीचे अध्यक्ष ओनिल आल्मेडा यांनी केले आहे.

या परिसंवादासाठी शेतकऱ्यांनी नावनोंदणी करणे आवश्यक आहे. यासाठी ९९२३००२८०८ व ८५५१९०२३०९ क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Congress Protest: 'सरेंडर दे सिलिंडर'; गॅसचं पोस्टर घेऊन पटोले, वडेट्टीवार विधानभवनात

Sunflower Farming: घाटनांद्रा परिसरात बहरली सूर्यफुलाची शेती

Chana Procurement Centers: हरभरा खरेदीसाठी नऊ केंद्रांना मंजुरी; २४ केंद्रांवर मका खरेदी सुरू

Biogas Plant: बायोगॅस ठरू शकतो दीर्घकालीन उपाय

MahaVistar AI: ज्ञानार्जनासाठी हक्काचे व्यासपीठ

SCROLL FOR NEXT