Hapus Mango Agrowon
ॲग्रो विशेष

Mango Update : चिपळूणला हापूस म्हणून कर्नाटकी आंब्यांची विक्री

Mango Market : परप्रांतीय विक्रेते हापूसच्या नावाखाली कर्नाटकचा आंबा विकत असल्यामुळे काही स्थानिक विक्रेत्यांनी त्यावर आक्षेप घेतला आहे.

Team Agrowon

Ratnagiri News : चिपळुण शहरात हापूस आंबा विक्रीमध्ये परप्रांतीय विरुद्ध स्थानिक व्यापारी अशी स्पर्धा सुरू झाली आहे. परप्रांतीय विक्रेते हापूसच्या नावाखाली कर्नाटकचा आंबा विकत असल्यामुळे काही स्थानिक विक्रेत्यांनी त्यावर आक्षेप घेतला आहे. हापूस आंब्याला बदनाम करणाऱ्यांचा यापुढे बंदोबस्त करण्याचा इशारा स्थानिक विक्रेत्यांनी दिला आहे.

चिपळूण आणि गुहागरमधील हापूस आंबा अजून म्हणावा तसा बाजारात आलेला नाही. येथील विक्रेते रत्नागिरीतून आंबा आणून विकत आहेत. रत्नागिरीच्या हापूस आंब्याला स्थानिक बाजारपेठेत तसेच बाहेरगावी मोठी मागणी आहे. चिपळूणमधील आंबा विक्रेते मुंबई, पुण्यासह दुबईच्या मार्केटमध्ये आंबा विकत आहेत.

चिपळूण शहरातील गुहागर नाका हे हापूस आंबा विक्रीचे केंद्र बनले आहे. येथे परिसरातील महिला, व्यापारी हापूस आंबा विक्री करत आहेत. मात्र काही जण हापूसच्या नावाखाली कर्नाटकी आंबा अडीच ते दोन हजार रुपये शेकडा दराने विकत आहेत. त्यामुळे स्थानिक व्यापाऱ्यांची अडचण झाली आहे. गुहागर नाका येथे स्थानिक विक्रेत्यांची नुकतीच बैठक झाली. त्यात विक्रेते फैयाज भाटकर यांनी हापूसच्या नावाखाली कर्नाटकचा आंबा विकणाऱ्यांना कायदेशीर अद्दल घडविण्याचा इशारा दिला.

कोकणातील हापूसची वैशिष्ट्ये...

हापूस आंबा कापल्यावर केशरी दिसतो. पिवळेपणाची झाक त्यावर नसते.

आंबा तयार झाल्यावर त्याच्यावर सुरकुत्या पडतात.

हापूस आंब्याची साल पातळ असते. देवगडची त्याहून अधिक पातळ असते.

हापूस आंब्याची पेटी अठरा ते वीस इंच इतकी असते.

रत्नागिरीच्या हापूस आंब्याला चिपळूणमध्ये मागणी आहे. त्यामुळे रत्नागिरीतून ५० हजारहून अधिक आंबा आणून विकला. आता काही विक्रेते हापूसच्या नावाखाली कर्नाटक आंबा विकत आहेत. त्यामुळे हापूस आंब्याला मागणी कमी होत आहे. हापूसला योग्य दर मिळत नाही. यापुढे कर्नाटकचा आंबा हापूस म्हणून विकणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करू.
फैयाज भाटकर, हापूस आंबा विक्रेते

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon 2026 In Kerala : मॉन्सूनचं २६ मे रोजी केरळात होणार आगमन; हवामानशास्त्र विभागाचा अंदाज

Monsoon Arrival 2026: माॅन्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान; मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात ५ दिवस पावसाची शक्यता

MSP Hike 2026: शेतीमालांच्या हमीभावाची वाढ अत्यंत तोकडी

Khat Dukan Karvai: : कृषी विभागाकडून १९ निविष्ठा केंद्रांवर सिंधुदुर्गात कारवाई

Onion Procurement: केंद्राकडून राज्यात १२ रुपये ३५ पैशानं कांद्याची खरेदी सुरु, मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती

SCROLL FOR NEXT