Team Agrowon
यंदा हापूसचा हंगाम मध्यात येऊन ठेपला आहे. गत वर्षीच्या तुलनेत लवकर कॅनिंगला सुरुवात झाली आहे.
सध्या २५ ते ३२ रुपये प्रतिकिलो या दरम्यान कॅनिंगच्या आंब्याचे दर राहतील, असा अंदाज आहे.
दोन दिवसांपूर्वी पावस परिसरातील कॅनिंग व्यावसायिकांनी ३२ रुपये किलोने आंबा विकत घेतला
बाजारात चांगला दर मिळत असल्यामुळे मुबलक आंबा असूनही कॅनिंगला माल देण्यासाठी बागायतदार पुढे आलेले नाहीत.
हापूस खासगी विकणाऱ्या बागायतदारांना पाच डझनच्या पेटीला ३ हजार रुपये दर मिळत आहे. तर दलालांकडे पेटी पाठवणाऱ्यांना १५०० ते १८०० रुपये पेटीला दर आहे. अनेक बागायतदार वैयक्तिक आंबा पाठविण्याच्या प्रयत्नात आहेत.
गत वर्षी आंबा उत्पादन कमी होते. त्यामुळे कॅनिंगसाठी आंबा खरेदीचा दर ५० ते ७५ रुपये किलो होता. उत्पादन खर्च अधिक झाल्याने पल्पचा किलोचा दर ६० ते ६५ रुपयांनी वाढला. गत वर्षी २२५ रुपये डब्याचा दर होता.
३ किलो १०० ग्रॅमचा दर १७० ते २०० रुपयांनी वाढला. पल्पचे दर अधिक असल्यामुळे आंबा बर्फी किंवा अन्य प्रक्रिया पदार्थांच्या किमती वाढल्या. त्यामुळे या पदार्थांची मागणी कमी झाली.
आंबा प्रक्रिया पदार्थांच्या विक्रीवर ३८ टक्के फरक पडला. परिणामी सुमारे ३० टक्के पल्प शिल्लक आहे.
या वर्षी सुरुवातीपासूनच आंबा अधिक आहे. कॅनिंगही एप्रिलमध्ये सुरू झाले असून १५ मेपर्यंत मालही चांगला असेल. दर कमी असल्यामुळे पल्प अधिक बाजारात येईल.
माल वाढल्यामुळे पुन्हा पल्पचे दर कमी होतील. १६० ते १७५ रुपये किलोने माल विकला जाऊ शकतो. २०२२ मध्ये अशी स्थिती निर्माण झाली होती. यंदा हापूस खरेदीसाठी ग्राहक मोठ्या प्रमाणात आहे. अशी स्थिती बाजारात कमी वेळा पाहायला मिळते