Cotton Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Variety : एका कापूस वाणाची जादा दराने विक्री

Cotton Cultivation : खानदेशात शासन किंवा कृषी विभागाच्या परवानगीनुसार कापूस बियाण्याची विक्री सुरू झाली आहे.

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Jalgaon News : खानदेशात शासन किंवा कृषी विभागाच्या परवानगीनुसार कापूस बियाण्याची विक्री सुरू झाली आहे. यात एका कंपनीचे कापूस वाण वितरक, विक्रेत्यांनाच जादा दर किंवा लिंकिंग करून मिळत आहे. त्याची सुमारे ३५० रुपये जादा दरात विक्री सुरू असल्याची माहिती आहे.

कापूस लागवड खानदेशात यंदा किंचित कमी होणार आहे. कारण कापूसदर हवे तसे नव्हते. पीक तोट्यात आहे. गुलाबी बोंड अळी, मजुरी, खते, कीडनाशकांची महागाई, तणनाशकांचा मोठा खर्च यामुळे शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. अशात नव्या हंगामात नफेखोर मंडळी कापूस उत्पादक, शेतकऱ्यांची पिळवणूक करू लागले आहेत.

यंदा कृषी विभागाच्या परवानगीनुसार कापूस बियाणे विक्री लवकर सुरू झाली आहे. खानदेशात जळगाव जिल्ह्यातील चोपडा, यावल, जामनेर, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारातील शहादा, तळोदा भागात कापूस बियाणे खरेदीस हळूहळू प्रतिसाद मिळत असल्याचे आहे. कापूस लागवडीची तयारी पूर्ण होत आली आहे. कापूस बियाण्याची खरेदीही काही भागांत सुरू झाली आहे.

अशातच कापूस बियाणे पुरवठादार कंपन्यांसह वितरकांची नफेखोरीही सुरू झाली आहे. कृत्रिम टंचाई करण्यासाठी मागणी अधिक असलेल्या कापूस वाणांचा पुरवठाच संबंधित कंपन्यांनी केलेला नाही. बियाणे कमी आहे, अशी बतावणी या कंपन्या करू लागल्या आहेत. यामुळे बाजारात संबंधित बियाण्याची टंचाई दिसत आहे.

एका कंपनीने आपले वाण वितरकांना दिले आहे. परंतु हे वाण वितरकांना लिंकिंग करून दिले असून, त्याची जादा दरात विक्री सुरू आहे. ८६४ रुपयांचे या वाणाचे एक पाकिट १२०० ते १३०० रुपये या दरात विविध भागांत शेतकऱ्यांच्या माथी मारले जात आहे. कापूस बियाणे बाजारात मक्तेदारी, सद्दी असलेल्या कंपन्यांना कुठलाही आवर घालण्याची किंवा तंबी देण्याची कार्यवाही कृषी विभागाने केलेली नसल्याने या कंपन्या मनमानी करीत आहेत.

दोन कंपन्यांचे वाण मिळेना

दोन कंपन्यांचे मागणी असलेले वाणच बाजारात नसल्याने ते वितरत, विक्रेते देण्यास असमर्थता दाखवीत आहेत. शेतकरीदेखील या वाणांची प्रतीक्षा करीत आहेत. हे वाण आल्यानंतर सर्वच त्याची मागणी करतील व काळाबाजार, जादा दरात विक्रीचा प्रकार सुरू होईल, असे चित्र तयार झाले आहे. यामुळे कृषी विभागाने कापूस बियाण्याचा एकूण पुरवठा, अधिक मागणीचे वाण व त्यांचा पुरवठा, दर याची माहिती घ्यावी, मोठी गावे, तालुकास्तरावर यंत्रणा राबवून योग्य ती कार्यवाही याबाबत करावी, अशी मागणीदेखील पुढे येत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orchard Water Management: पाण्याच्या उपलब्धतेनुसार अतिघन बागेचे नियोजन

Soybean Crop Management: सोयाबीनमधील फुलगळीची कारणे जाणून उपाययोजना आवश्‍यक

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

SCROLL FOR NEXT