Agriculture Drone Agrowon
ॲग्रो विशेष

Agricultural Drone : ड्रोनद्वारे फवारणीतून‌ स्वयंरोजगाराची संधी

Drone Use : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि हरियानातील फरिदाबाद येथील वॉव गो ग्रीन कृषी विमान (ड्रोन) यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला.

Team Agrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा

Parbhani News : परभणी : विविध पिकांतील कीड व अन्नद्रव्य व्यवस्थापनसाठी कृषी ड्रोनद्वारे फवारणी केल्यास खर्च व वेळेची बचत होते. त्यादृष्टीने भाडेतत्त्वावर ड्रोन उपलब्ध व्हावेत. त्यांची देखभाल व दुरुस्ती तसेच युवा शेतकऱ्यांना स्मार्ट व प्रगतिशील तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीतील कामे व स्वयंरोजगार निर्मिती करता यावी या दृष्टिकोनातून वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि हरियानातील फरिदाबाद येथील वॉव गो ग्रीन कृषी विमान (ड्रोन) यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला.

कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांच्या प्रमुख उपस्थितीत या सामंजस्य करारावर विद्यापीठातर्फे संचालक संशोधन डॉखिजर बेग, संचालक शिक्षण डॉ. उदय खोडके, संशोधन अभियंता डॉ. स्मिता सोलंकी, डॉ. विशाल इंगळे तसेच वॉव गो ग्रीन कृषी विमान (ड्रोन) चे संचालक शंकर गोयंका, राहुल मगदुम, गंगाधर कोल्हे यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या प्रसंगी संचालक विस्तार शिक्षण डॉ. धर्मराज गोखले, डॉ. राहुल रामटेके, डॉ. प्रवीण कापसे, प्रगतिशील शेतकरी मंगेश देशमुख (पेडगाव), सचिन शेळके (पारवा), सचिन देशमुख (पिंपरी) यांची उपस्थिती होती. ‌

कुलगुरू डॉ. इंद्र मणी म्हणाले, ‘या करारामुळे शेतकऱ्यांना भाडेतत्त्वावर ड्रोन आधारित शास्त्रशुद्ध पद्धतीने फवारणी करणे सुलभ होईल. युवा शेतकरी गटास स्वंयरोजगाराची संधी उपलब्ध होईल. अल्पभूधारक शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न करण्यात येऊन शेतीतील कामासाठी फवारणीमुळे भाडेतत्त्वावर ड्रोन उभारणी केंद्राचा आर्थिकदृष्ट्या फायदा होईल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT