Agriculture  Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Award : कृषी पुरस्कारासाठी सातारा जिल्ह्यातील १२ शेतकऱ्यांची निवड

Latest Agriculture News : राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या विविध कृषीविषयक पुरस्कारांची घोषणा झाली असून, त्यात जिल्ह्यातील १२ शेतकऱ्यांसह व एका कृषी सहायकाचा समावेश आहे.

Team Agrowon

Satara News : राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या विविध कृषीविषयक पुरस्कारांची घोषणा झाली असून, त्यात जिल्ह्यातील १२ शेतकऱ्यांसह व एका कृषी सहायकाचा समावेश आहे.

यामध्ये वसंतराव नाईक शेतिनिष्ठ पुरस्कार २०२० (कोल्हापूर विभाग सर्वसाधारण गट) नितीन बाजीराव वरखडे (रा. वरखडवाडी, ता. वाई), वसंतराव नाईक शेतिनिष्ठ पुरस्कार २०२१ (कोल्हापूर विभाग सर्वसाधारण गट) अधिक मारुती माने (मानेगाव, ता. पाटण), वसंतराव नाईक शेतिनिष्ठ पुरस्कार २०२२ (कोल्हापूर विभाग सर्वसाधारण गट) प्रशांत भिकू शिंगटे (रा. खडकी, ता. वाई),

वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार २०२१ (कोल्हापूर विभाग विभागून) सचिन साधू सांगळे (रा. कुरवली बुद्रुक, ता. फलटण), उद्यानपंडित पुरस्कार २०२१ (कोल्हापूर विभाग विभागून) रामदास भुजंगराव कदम (रा. गिरवी, ता. फलटण), युवा शेतकरी पुरस्कार २०२१ (कोल्हापूर विभाग ) सौरभ विनयकुमार कोकीळ, (उद्यानपंडित पुरस्कार २०२२ (कोल्हापूर विभाग)

जालिंदर जगन्नाथ दडस (टाकेवाडी, ता. माण), कृषिभूषण (सेंद्रिय शेती) पुरस्कार २०२१ (कोल्हापूर विभाग) अरुण चंद्रकांत कचरे (रा. वाघेरी, ता. कऱ्हाड), कृषिभूषण (सेंद्रिय शेती) पुरस्कार २०२२ (कोल्हापूर विभाग) उद्धवराव ज्ञानेश्वर बाबर (रा. देवापूर, ता. माण), वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार २०२२ (कोल्हापूर विभाग विभागून)

संदीप राजाराम डाकवे (रा. डाकेवाडी, ता. पाटण), युवा शेतकरी पुरस्कार २०२२ (कोल्हापूर विभाग विभागून) नीलेश हणमंत पवार (रा. असवली, ता. खंडाळा), जिजामाता कृषिभूषण पुरस्कार (कोल्हापूर विभाग) रूपाली सत्यवान जाधव (रा. कर्णवडी, ता. खंडाळा) यांना, तर पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार (कोल्हापूर विभाग) कृषी सहायक सचिन सोमा जाधव (रा. सासकल, ता. फलटण) यांना जाहीर झाला. यातील अनेक विजेत्या शेतकऱ्यांची यशकथा दैनिक ॲग्रोवनमध्ये प्रसिद्ध झाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Khandesh Temperature Rise: खानदेशात उष्णता वाढू लागली; शेतीकामांच्या वेळेत होतोय बदल

Weather Update: राज्यात ऊन, उकाडा वाढला; बहुतांशी भागांत किमान आणि कमाल तापमानात वाढ

Girna Dam: गिरणा धरणातून दुसरे आवर्तन

IAS Varsha Meena: प्रत्येक कुटुंबाला शुद्ध पाणी देण्याचा प्रयत्न करा : जिल्हाधिकारी वर्षा मीना

Medicinal Plants: औषधी वनस्पतींमुळे उत्पन्न वाढणार

SCROLL FOR NEXT