Koyna Dam Security agrowon
ॲग्रो विशेष

Koyna Dam Security : कोयना धरणाच्या सुरक्षेला मिळणार आणखी बळकटी; तीन अद्ययावत उपकरणे बसणार

Koyna Dam Satara : कोयना धरणाच्या परिक्षेत्रात होणाऱ्या भूकंपाच्या धक्क्यामुळे धरणावर काय परिणाम होतो, याचा अभ्यास करण्यासाठी विशिष्ट स्वरूपाची यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे.

sandeep Shirguppe

Koyna Dam Earthquake Alert : कोयना धरण परिसरात वारंवार भूकंप होत असतात याबाबत सुरक्षा म्हणून सरकारने दक्षता घेतली आहे. कोयना धरणाच्या परिक्षेत्रात होणाऱ्या भूकंपाच्या धक्क्यामुळे धरणावर काय परिणाम होतो, याचा अभ्यास करण्यासाठी विशिष्ट स्वरूपाची यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे. राज्य सरकारने हे काम हाती घेतल्यामुळे कोयना धरणाची सुरक्षा अधिक बळकट होणार आहे. याबाबत कोयना सिंचन विभागाते कार्यकारी अभियंता नितीन पोतदार यांनी माहिती दिली आहे.

कार्यकारी अभियंता पोतदार यांनी दिलेल्या माहितीनुसार, "कोयना धरण परिसरात दरवर्षी किती भूकंप होतात. त्यांची संख्या आणि तीव्रता जाणून घेण्यासाठी कोयनेत स्वतंत्र लॅब आहे. नाशिकच्या मेरी संस्थेतर्गत या लॅबचे कामकाज सुरू आहे. या कामासाठी पुरेसा निधीही उपलब्ध आहे. त्यामुळे हे काम आता नियमित सुरू आहे. त्याप्रमाणे धरणाची सुरक्षितता आणि सुधारणा यासंदर्भातील काही कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यातून कोयना धरणाची सुरक्षितता अधिक बळकट होणार आहे". अशी माहिती पोतदार यांनी दिली.

भूकंपामुळे धरणावर होणाऱ्या परिणामांच्या अभ्यास

कोयना परिसरात ११ डिसेंबर १९६७ ला सहा रिश्टर स्केलचा मोठा भूकंप झाला होता. त्यानंतर १ ते ३ रिश्टर स्केलचे भूकंप या परिसरात नेहमी होत असतात. कोयना धरण प्रशासनाकडून भूकंपमापनाऐवजी भूकंपाच्या धक्क्यांमुळे धरणावर होणाऱ्या परिणामांच्या अभ्यासाकडे लक्ष केंद्रित करण्यात आले.

त्याअनुषंगाने भूकंपाच्या धक्क्यांचा धरणावर होणाऱ्या परिणामांचे विश्लेषण करण्यासाठी त्वरण आलेखी उपकरणे (स्ट्राँग्र मोशन एक्सेलेरोग्राफ) बसवण्याचे निश्चित झाले आहे. यासंदर्भातील प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आले आहेत. सहा महिन्यांपूर्वी कोयनेत उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची बैठक झाली होती. बैठकीत धरणाच्या सुरक्षितता विभागाने प्रमुख धरणांमध्ये भूकंप मापनासाठी यंत्रणा उभारण्याचा निर्णय घेतला होता.

त्यानुसार कोयना धरणाच्या तळाशी, मध्यभागी आणि वरील भागात प्रत्येकी तीन उपकरणे बसवली जाणार आहेत. त्यामार्फत संकलित माहितीद्वारे धरणाच्या संभाव्य नुकसानीचा अभ्यास करता येणार आहे.

कोयना धरण परिसरात होत असलेल्या भूकंप मापनाचे काम सध्या भारतीय हवामान विभागाकडे आहे. या विभागाचे एक केंद्र महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्थेच्या नाशिक मुख्यालयात आहे. दरम्यान, धरण सुरक्षितता कायदा लागू झाल्यामुळे धरणांच्या स्थितीकडे लक्ष देणे क्रमप्राप्त ठरले आहे. त्यामुळे कोयना धरण सुरक्षितता विभागाने प्राधान्यक्रम बदलला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sangola Water Crisis: सांगोल्यातील बंधारे कोरडे; जलसंकट वाढले

Farmer Compensation: बाधित शेतकऱ्यांच्या मोबदल्यासाठी खलबते

Fruit Drop Subsidy Issue: संत्रा, मोसंबी, फळगळ अनुदानामध्ये गोंधळ

Fund Delay: स्थगितीला वाव देण्यासाठी निधी वर्ग करण्यास उशीर?

Maharajasva Campaign: महाराजस्व अभियान यशस्वी करण्यासाठी समन्वयाने काम करा: जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

SCROLL FOR NEXT