Money Lending Agrowon
ॲग्रो विशेष

Money Lending : सावकारीच्या तक्रारीवरून दोन जणांवर झडतीची कारवाई

Latest Agriculture News : तालुक्यातील अवैध सावकारी व्यवहारासंबंधीच्या प्राप्त तक्रारीच्या चौकशीसाठी सहकार व पोलिस विभागाच्या पथकाने दोन व्यक्तींविरुद्ध शुक्रवारी (ता.९) झडतीची कार्यवाही करण्यात आली.

Team Agrowon

Washim News : तालुक्यातील अवैध सावकारी व्यवहारासंबंधीच्या प्राप्त तक्रारीच्या चौकशीसाठी सहकार व पोलिस विभागाच्या पथकाने दोन व्यक्तींविरुद्ध शुक्रवारी (ता.९) झडतीची कार्यवाही करण्यात आली.

यात वाशीममधील गजानन कव्हर आणि दीपक गाडे या दोन गैरअर्जदारांविरुद्ध करण्यात आलेल्या कार्यवाही दरम्यान कथित अवैध सावकारी व्यवहारासंबंधी पुढील चौकशीसाठी त्यांची स्थावर मालमत्तेची कागदपत्रे, खरेदी खते ताब्यात घेण्यात आलेली आहेत. तसेच एका प्रकरणात कोरे बाँड, धनादेश कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली. या अनुषंगाने सावकारी कायद्याअंतर्गत पुढील चौकशी करण्यात येत आहे.

ही कार्यवाही जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस, पोलिस अधीक्षक अनुज तारे, अमरावतीचे विभागीय सहनिबंधक शंकर कुंभार यांच्या मार्गदर्शन व नियंत्रणाखाली जिल्हा उपनिबंधक दिग्विजय राठोड यांनी पार पाडली आहे. या कार्यवाहीमध्ये सहायक निबंधक प्रशासन आर. आर. सावंत, सहायक निबंधक एम. डी. कच्छवे यांनी पथक प्रमुख म्हणून कामगिरी केली.

या दोन पथकांमध्ये रिसोडचे सहायक निबंधक अक्षय गुट्टे, सहकार अधिकारी पी. एन. झळके, सहकार अधिकारी बी. बी. मोरे, मालेगावचे सहकार अधिकारी के. जी. चव्हाण, मुख्य लिपीक पी. आर. वाडेकर, एस. पी. रोडगे, सहायक सहकार अधिकारी एम. जे. भेंडेकर, वरिष्ठ लिपिक एस. जी. गादेकर, कनिष्ठ लिपिक बी. ए. इंगळे, मदतनीस व्ही. ए. इंगोले यांनी सहायक म्हणून कामकाज केले.

वाशीम जिल्ह्यातील नागरिकांनी अवैध सावकारी व्यवहार करणाऱ्यावर प्रभावी नियंत्रण व कार्यवाही करण्यासाठी सहकार विभागाचे जिल्हा निबंधक (सावकारी) तथा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, व सावकाराचे सहायक निबंधक तथा सहायक निबंधक, सहकारी संस्था, या कार्यालयाकडे गोपनीय स्वरूपाच्या तक्रारी दाखल करून अशा व्यक्तींची माहिती द्यावी. तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहन सहकारी संस्थेचे जिल्हा निबंधक दिग्विजय राठोड यांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT