Dr. Kailas Mote Agrowon
ॲग्रो विशेष

Scotch Award : फलोत्पादन संचालक डॉ. मोते यांना स्कॉच पुरस्कार जाहीर

Horticulture Director : राज्याच्या सूक्ष्म सिंचन प्रकल्पात भरीव कामगिरी केल्याबद्दल फलोत्पादन संचालक डॉ. कैलास मोते यांना २०२४ चा मानाचा ‘स्कॉच’ अॅवॉर्ड जाहीर झाला आहे.

Team Agrowon

Pune News : राज्याच्या सूक्ष्म सिंचन प्रकल्पात भरीव कामगिरी केल्याबद्दल फलोत्पादन संचालक डॉ. कैलास मोते यांना २०२४ चा मानाचा ‘स्कॉच’ अॅवॉर्ड जाहीर झाला आहे. ‘स्कॉच’ समूहाचे व्यवस्थापकीय संचालक दीपक दलाल यांनी अलीकडेच पुरस्काराची घोषणा केली.

त्यानंतर डॉ. मोते यांचे राज्याच्या कृषी व संलग्न क्षेत्रातील संस्था, प्रगतशील शेतकरी, फलोत्पादनातील संघ तसेच कृषी खात्याच्या विविध संघटनांकडून अभिनंदन होत आहे. १३ जुलै रोजी दिल्लीतील विशेष सोहळ्यात या पुरस्काराचे वितरण होईल.

डॉ. मोते म्हणाले की, राज्यात राबविलेल्या ‘प्रति थेंब अधिक पीक’ या उपक्रमाचे सादरीकरण स्कॉच निवड समितीसमोर करण्यात आले होते. अर्ज निवडीपासून ते अनुदान वाटपापर्यंत शेतकऱ्यांना संगणकीय प्रणालीद्वारे पारदर्शकता व जलद सेवा देणारा हा प्रकल्प आहे.

शेतकऱ्यांना विशिष्ट कालावधीत अर्जाची सक्ती न करता ऑनलाइन अर्ज करण्याची सेवा वर्षभर देण्यात आली आहे. २०२२-२३ मध्ये या प्रकल्पाने केंद्राकडून निधीचे चारही हप्ते मिळवत वेळेत शेतकऱ्यांना अनुदान देणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले होते.

(ॲग्रो विशेष)

देशात सर्वाधिक क्षेत्र सूक्ष्म सिंचनाखाली आणण्याचा मान महाराष्ट्राकडे आहे. डॉ. मोते यांनी कागद विरहित अनुदान वितरण व्यवस्था तयार केली. पर्यवेक्षणाचे टप्पे कमी केले. सूक्ष्म सिंचन क्षेत्र वाढल्यामुळे पाणी, खते, पैसा याची बचत झाली. फळबागांची उत्पादकता वाढली व शेतकऱ्यांच्या उत्पन्नातही भर पडली.

फलोत्पादन विभागाच्या सूक्ष्म सिंचनविषयक उपक्रमामुळे कमी वेळेत निधी वितरणाची कार्यवाही करणे शक्य झाले आहे. मूळ शेतकऱ्याला थेट बॅंक खात्यात अनुदान जात असल्यामुळे गैरप्रकार थांबले आहेत.

सूक्ष्म सिंचन संचाचा कार्यक्षम वापर होण्यासाठी वर्षातून दोनदा दुरुस्ती व देखभाल पंधरवडा आयोजित केला जातो. डॉ. मोते यांनी पाठपुरावा करीत राज्य शासनाची पूरक अनुदान योजना सुरू करण्यात यश मिळवले. त्यामुळे शेतकऱ्यांना आता राज्यात सूक्ष्म सिंचन संचासाठी ८० ते ९० टक्क्यांपर्यंत अनुदान मिळते आहे.

पुरस्कार मिळाल्याचा आनंद आहे. अर्थात, त्याचे श्रेय राज्यातील कृषी कर्मचाऱ्यांना प्रयोगशील फळबागायईतदार शेतकऱ्यांना जाते. पुरेसा निधी मिळणे व वेळेत अनुदान वाटप होणे ही आव्हाने अद्यापही कायम आहेत. त्यावर तोडगा काढण्यासाठी आमची धडपड सुरू आहे.
- डॉ. कैलास मोते, फलोत्पादन संचालक

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ramlila Maidan Farmer Protest : दिल्लीच्या रामलीला मैदानावर हजारो शेतकरी एकत्र जमले; केंद्र सरकारकडे हमीभाव कायदा, कर्जमाफीची मागणी

Farmer ID Scam: बनावट फार्मर आयडी, जमीन एकाची, अनुदान दुसऱ्याला, नेमका घोळ काय?

Kolhapur ZP President: कोल्हापूर ‘झेडपी’च्या अध्यक्षपदी शिल्पा खोत यांची बिनविरोध निवड

Water Scarcity: वर्ध्यावर पाणीटंचाईचे सावट

Unseasonal Rain Damage: शिरोळ तालुक्याला वादळी पावसाचा तडाखा

SCROLL FOR NEXT