Palghar ZP School Agrowon
ॲग्रो विशेष

Palghar ZP School : पालघर जिल्ह्यातील शाळांच्या इमारती धाेकादायक

Zilha Parishad School : ग्रामीण भागातील शाळा गुरुवारपासून (ता. १५) सुरू होत आहे. मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पालघर जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना यावर्षी जीव मुठीत घेऊन शिक्षण घ्यावे लागत आहे.

Team Agrowon

Palghar News : ग्रामीण भागातील शाळा गुरुवारपासून (ता. १५) सुरू होत आहे. मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पालघर जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना यावर्षी जीव मुठीत घेऊन शिक्षण घ्यावे लागत आहे.

जिल्हा परिषद अंतर्गत शेकडो शाळांची दुरवस्था झाली असून दुरुस्तीकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे. डहाणूमधील ग्रामीण विद्यार्थी जीर्ण आणि पडझड झालेल्या शाळांमध्ये शिक्षणाचे धडे गिरवत आहेत.

दहिगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीची दुरवस्था झाली आहे. इमारतीचे छप्पर, भिंती जीर्ण झाले असून पावसाळ्यात कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शाळा परिसरात संरक्षण भिंतीचे काम सुरू आहे.

मात्र इमारतीच्या दुरवस्थेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने पालकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. शिक्षण, पालघर जिल्ह्यात आजही शिक्षण, शिक्षण विभागाचा बोजवारा उडालेला पाहायला मिळत आहे.

दहिगाव शाळेची दुरवस्था असताना याच शाळेबाहेर लाखो रुपये खर्च करून संरक्षण भिंत बांधण्याचे काम सुरू आहे. मात्र विद्यार्थ्यांच्या जीवापेक्षा पालघर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला संरक्षण भिंत अधिक महत्त्वाची वाटत आहे.
शैलेश तांबडा, पालक
जिल्हा परिषदेमार्फत शाळा दुरुस्ती केली जाते. दहिगाव शाळा दुरुस्तीसाठी ग्रामपंचायत व शाळेकडून दुरुस्तीचा प्रस्ताव आल्यास तो पुढे पाठवण्यात येईल.
पल्लवी सस्ते, गटविकास अधिकारी, डहाणू

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT