Scholership Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Scholarship : आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुलांसाठी शिष्यवृत्ती

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Amaravati News : आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाची वाताहात होते. ही बाब लक्षात घेता अशा कुटुंबियांप्रती संवेदनात जपत या कुटुंबातील पाल्यांना दहा हजार रुपयांची शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय अमरावती जिल्हा परिषदेने घेतला आहे. सेस फंडातून याकरिता पंधरा लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

वातावरणातील बदलाच्या परिणामी शेतीक्षेत्रात अनिश्चितता वाढीस लागली आहे. गेल्या काही वर्षांत खरीप हंगामाच्या सुरुवातीला पावसाचा खंड आणि त्यानंतर अतिवृष्टी अनुभवली जात आहे. हंगामाच्या शेवटी देखील पाऊस पडत असल्याने कीड-रोगांचा प्रादुर्भाव वाढत त्याचा पिकाच्या उत्पादकतेवर परिणाम होतो. यातूनच अपेक्षित उत्पादकता आणि उत्पन्न हाताला लागत नाही.

त्यामुळे नैराश्‍य वाढत असल्याने शेतकरी आत्महत्या करतात. आत्महत्या करणाऱ्या अशा शेतकऱ्यांवर खासगी तसेच बॅंकांचे कर्जही राहते. गेल्या काही वर्षात सर्वाधीक आत्महत्यांची नोंद अमरावती विभागात व त्यातही अमरावती जिल्ह्यांत करण्यात आली आहे. ही बाब गांभीर्याने घेत अशा कुटुंबियांच्या मदतीसाठी जिल्हा परिषद प्रशासनाकडून पुढाकार घेण्यात आला आहे.

या कुटुंबातील पाल्यांना शिक्षण तसेच इतर क्षेत्रातील कामासाठी म्हणून दहा हजार रुपयांची शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय या अंतर्गत घेण्यात आला आहे. त्याकरिता २०२२-२३ आणि २०२३-२४ या वर्षातील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबियांची माहिती मागविण्यात आली.

या माध्यमातून जिल्ह्यात आत्महत्याग्रस्त कुटुंबात १५० पाल्य असल्याची बाब समोर आली असून त्यांच्याकरिता प्रत्येकी दहा हजार प्रमाणे १५ लाख रुपयांची तरतूद केली आहे. सेस फंडातून हा निधी उपलब्ध केला जाणार आहे.

कृषी विकास अधिकाऱ्यांचा पुढाकार

आत्महत्याग्रस्त कुटुंबियांसाठी महत्त्वाकांक्षी अशा या योजनेचा प्रस्ताव जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी अजय तळेगावकर यांनी तयार केला. त्यानंतर हा प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्‍यांत पंडा यांच्या मार्गदर्शनात अतिरिक्‍त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी यांच्याकडे मान्यतेसाठी सादर करण्यात आला.

डीबीटीमार्फत खात्यात निधी

जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत या योजनेची अंमलबजावणी होत असून थेट लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यावर भर देण्यात आला आहे. आतापर्यंत १५० पैकी ८९ लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात आल्याची माहिती अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी यांनी दिली.

आत्महत्याग्रस्त कुटुंबातील पाल्यांना पैशाअभावी शिक्षण सोडावे लागू नये याकरिता हा उपक्रम राबविण्यात आला आहे. यासाठी सेस फंडातून १५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली. प्रत्येकी दहा हजार रुपये देण्यावर भर आहे.
- अविश्‍यांत पंडा, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, अमरावती

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : कांद्यात चढ उतार कायम; कापूस, सोयाबीन, कांदा तसेच काय आहेत टोमॅटो दर?

Khapali Wheat : खपली गहू लागवडीला हवे प्रोत्साहन

Nana Patole : शेतकऱ्यांचा आवाज सत्तेपर्यंत पोहोचवणारे नाना पटोले

Farmers Welfare : शेतकरी कल्याणाचा वसा

Return Monsoon : परतीचा माॅन्सून महाराष्ट्रात दाखल; राज्यातील काही भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT