Cotton Seeds  Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Seeds : अत्यल्प कापूस बियाणे

Team Agrowon

Jalgaon News : शासनाने मोठा गाजावाजा करून कापूस बियाणे विक्री १५ मे पासून सुरू करण्याचे आदेश जारी केले. परंतु कापूस बियाणे उत्पादक, पुरवठादार कंपन्यांकडून बियाण्याचा पुरवठा अल्प असून, लिंकिंग, जादा दरात पुरवठा कंपन्या करीत आहेत. यामुळे बाजारात कापूस बियाणे टंचाई असून, काळाबाजार सुरू आहे.

काळ्या बाजारात कापूस बियाणे १२०० ते १३०० रुपये प्रतिपाकिट या दरात मिळत आहे. प्रमुख चार कंपन्यांनी बियाण्याचा पुरवठा जादा दरात करू, ८६४ रुपये प्रतिपाकिट दर परवडत नाही, आमच्याकडे बियाणे कमी आहे, अशी बतावणी वितरकांना सुरू केली. वितरकांना ११०० ते ११५० रुपये प्रतिपाकिट या दरात कापूस बियाणे देऊ, अशी आडमुठी भूमिका या कंपन्यांनी घेतली.

यामुळे पुढे ८६४ रुपये प्रतिपाकिट या दरातील बियाण्याचे दर १३०० रुपये प्रतिपाकिटपेक्षा अधिक आहेत. कृषी विभागाला याची सर्व माहिती आहे, परंतु बियाणे पुरवठादार कंपनी, वितरकावर कुठेही कारवाई झालेली नाही. बियाणे पुरवठादार कंपन्या मनमानी करीत असून, काही वितरक या प्रकारास बळ देत आहेत.

बियाणे खते, वितरक, विक्रेते असोसिएशनही चुप्पी साधून आहे. यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. कापूस उत्पादकांना यंदा दर ६५०० ते ६८०० रुपये प्रतिक्विंटल मिळाले. त्यात नैसर्गिक समस्या, गुलाबी बोंड अळीचा प्रकारही होता. अशात शेतकऱ्यांना बियाण्याची जादा दरात खरेदी करावी लागत आहे.

शेतकऱ्यांची लूट; ‘कृषी’ची बघ्याची भूमिका

खानदेशात एकूण ४३ लाख पाकिटे कापूस बियाण्याचा पुरवठा होणार आहे. यातील किमान २५ टक्के बियाण्याचा पुरवठा आजपर्यंत अपेक्षित होता. परंतु हवे तेवढे बियाणे आलेले नाही. अधिक मागणी असलेल्या वाणांची कृत्रीम टंचाई कंपन्यांनी तयार केली असून, नफेखोरी सर्रास सुरू आहे. याबाबत एकही कारवाई कृषी विभागाने खानदेशात केलेली नाही. कृषी विभाग बघ्याची भूमिका घेत असून, शेतकऱ्यांची लूट होत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

Soybean Procurement Center : मंचर बाजार समितीमध्ये लवकरच सोयाबीन खरेदी केंद्र

Pune Rain : धरणक्षेत्रांत पावसाच्या जोरदार सरी

National Water Awards : पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांवर महाराष्ट्राची छाप

Greenhouse Project Inaguration : वाण विकासासाठी हरितगृह फायदेशीर : डॉ. पाटील

SCROLL FOR NEXT