Wakurde Water Project Agrowon
ॲग्रो विशेष

Water Demand : वाकुर्डे योजनेच्या पाण्यासाठी आज शेतकऱ्यांसमवेत सत्याग्रह

Wakurde Water Scheme : वाळवा तालुक्यातील वंचित गावांना पूर्ण क्षमतेने पाण्याचा लाभ कायमस्वरूपी मिळवा या मागण्यांसाठी गुरुवारी (ता. १६) सत्याग्रह करणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे बी. जी. पाटील यांनी दिली.

Team Agrowon

Sangli News : काम निकृष्ट झाल्याने वाकुर्डे बुद्रुक कालव्याला अनेक ठिकाणी गळती लागली आहे. शेतजमीन व पिकांचे नुकसान झाले आहे. निकृष्ठ कामाचे पंचनामे करून संबंधितांवर कारवाई करावी,

वाळवा तालुक्यातील वंचित गावांना पूर्ण क्षमतेने पाण्याचा लाभ कायमस्वरूपी मिळवा या मागण्यांसाठी गुरुवारी (ता. १६) सत्याग्रह करणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे बी. जी. पाटील यांनी दिली. वाकुर्डे बुद्रुक येथील करमजाईदेवी मंदिरासमोर सकाळी दहा वाजता स्थानिक शेतकऱ्यांसमवेत उपोषणास बसणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पत्रकार परिषदेत बी. जी. पाटील बोलत होते. शेतकरी दगडू शेटके, वसंत शेटके, नाथा शेटके, निवृत्ती शेटके, जगन्नाथ शेटके, हणमंत माने, भाऊसाहेब जाधव, गोरक शेटके आदी उपस्थित होते. प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन यांना या मागण्यांचे निवेदन देण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले.

ते म्हणाले, ‘वाकुर्डे बुद्रुक योजनेचे कंत्राटदार, इंजिनीअर, स्थानिक राजकीय राजकर्ते यांची मिलीभगत आहे. २०१० मध्ये वाकुर्डे बुद्रुक योजनेचे काम सुरू झाले आहे. २०१५ पर्यंत कामाला चांगली गती होती. ही योजना मुळी डोंगराच्या खालच्या बाजूने मंजूर होती. मात्र त्यात बदल करून उंच बाजूने नेल्याने शेतकऱ्यांच्या जमिनीचे नुकसान होत आहे. कालव्यामधील असणाऱ्या ८ ते ९ फाटकाला ओघळी व ओढ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. साधारणपणे ४०० एकरवर शेतजमिनीचे नुकसान झाले आहे.

निवेदनातील मागण्या

शेतकऱ्यांच्या कालव्यासाठी शेतजमिनींचा मोबदला तातडीने मिळावा

कालव्याच्या भरावामुळे शेतजमिनीवर पडल्याने नुकसान भरपाई मिळावी. ती ठेकेदाराच्या बिलातून वसूल करावी

कालवा आवर्तन सुरू झाल्यावर पाण्यामुळे नुकसान झालेल्या पिकांची भरपाई त्वरित मिळावी

निकृष्ट झालेल्या कामाचे पंचनामे करून कंत्राटदार, अभियंत्यांना जबाबदार धरून त्यांची संपत्ती जप्त करावी.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maratha Youth Scheme: कर्जाचा व्याज परतावा तातडीने द्या : तांबे

Farmer Cup 2026: फार्मर कप स्पर्धेत पुतळीच्या महिला समूहाचा सहभाग

HTBT Cotton Seeds: नागपुरात संशयास्पद एचटीबीटी कापूस बियाणे जप्त

Satara Rain News: पूर्वमोसमी पावसाचा साताऱ्याला मोठा फटका

Hingoli Water Scarcity: पाणीटंचाई निवारणार्थ २८ गावांमध्ये ३६ नवीन विंधन विहिरीना मंजुरी

SCROLL FOR NEXT