Koyna Dam agrowon
ॲग्रो विशेष

Water Crisis : ‘कोयना’तून पाणी सोडण्यात साताऱ्याच्या पालकमंत्र्यांची आडकाठी?

Koyna Dam : कोयना धरणातून सांगलीसाठी पाणी सोडण्याबाबत अजूनही सातारा जिल्ह्यातून आडकाठी सुरू असल्याचे चित्र समोर आले आहे. साताऱ्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई यांचा हस्तक्षेप असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

Team Agrowon

Sangli News : जिल्ह्यात पाणी टंचाई तीव्र झाली. त्यानंतर यासंदर्भात बैठकही घेण्यात आली. यादरम्यान, कोयनेतून तीन टीएमसी पाणी सोडवे, अशी मागणी केली, परंतु एकच टीएमसी पाणी सोडले.

कोयना धरणातून सांगलीसाठी पाणी सोडण्याबाबत अजूनही सातारा जिल्ह्यातून आडकाठी सुरू असल्याचे चित्र समोर आले आहे. साताऱ्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई यांचा हस्तक्षेप असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

सध्या कोयनेतून सोडलेले पाणी सांगली जिल्ह्यात आले असल्याने शेतकऱ्यांना दिसाला मिळाला असला तरी, सातारा जिल्ह्यातील नेत्यांकडून पाणी सोडण्याबाबत हस्तक्षेप होत असल्याने जिल्ह्यातील शेतकरी संतप्त झाला आहे. कृष्णा नदीत अभूतपूर्व गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. सलग पंधरा दिवस नदी कोरडी पडली आहे.

त्या स्थितीत शेतकऱ्यांनी डोहातील तळ रिकामे केले. परिणामी, बंधारे पूर्ण कोरडे पडले. कोयना धरणातून शुक्रवारपासून २१०० क्युसेकने पाणी सोडण्यात आल्यानंतर पूर्वीप्रमाणे ते दोन दिवसांत म्हणजे रविवारी किंवा सोमवारी उशिरा सांगलीत येईल, असे सांगण्यात येत होते.

खासदार, आमदारांचीही नाराजी

कोयना धरणातून सांगलीसाठी पाणी सोडण्याबाबत अजूनही सातारा जिल्ह्यातून आडकाठी सुरू असल्याचे चित्र समोर आले आहे. साताऱ्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई यांचा हस्तक्षेप असल्याच्या चर्चा होत्या आणि त्याबाबत पालकमंत्री सुरेश खाडे, खासदार संजय पाटील यांच्यासह सर्वच आमदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतरही अद्याप मागणीइतके पाणी देण्यास नकारघंटा वाजवली जात आहे. याचा अर्थ काय, असा प्रश्‍न उपस्थित आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cabbage Farming: कोबी पिकात आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब

Brazil Agricultural Cooperation: ब्राझीलसोबत कृषी क्षेत्रामध्ये सहकार्य संधी

Onion MSP Demand: कांद्याला तातडीने प्रतिक्विंटल २ हजार हमीभाव, १,५०० रुपये अनुदान देण्याची मागणी

Akola Heatwave: अकोला जिल्ह्यात अति उष्णतेमुळे होरपळ

Mini kit Seeds Application: मिनीकिट बियाण्यांसाठी अर्जाचा आज शेवटचा दिवस

SCROLL FOR NEXT