Koyna Irrigation : ‘कोयने’तून पाण्याची भीक का मागायची?

Koyna Dam : कोयना धरणात विद्युत निर्मितीसाठी राखीव असलेल्या ३५ टीएमसीपैकी ८.९० टीएमसी पाणी सिंचन योजनांसाठी प्राधान्याने द्यावे.
Satara Dam
Satara DamAgrowon

Sangli News : कोयना धरणात विद्युत निर्मितीसाठी राखीव असलेल्या ३५ टीएमसीपैकी ८.९० टीएमसी पाणी सिंचन योजनांसाठी प्राधान्याने द्यावे. या पाण्यातून सुमारे २२८ कोटींची वीज तयार होऊ शकते, तेवढी वीज विकत घेणे परवडेल, मात्र दुष्काळावर पाचशे-साडेपाचशे कोटी खर्च करणे परवडणारे नाही. इथून पुढे कृष्णा नदी कोरडी पडता कामा नये. आम्ही पाण्याची भीक मागणार नाही, अशी स्पष्ट भूमिका रविवारी (ता. २९) कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आली.

गणेशोत्सवात आणि आतादेखील कृष्णा नदी कोरडी पडली आहे. पाटबंधारे विभागाने पाण्याची मागणी करताच पाणी दिले पाहिजे. त्यात कोणताही हस्तक्षेप चालणार नाही. दोन जिल्हाधिकारी, दोन अधीक्षक अभियंता आणि एक मुख्य अभियंता एवढ्या पातळीवर तो निर्णय झाला पाहिजे, अशा मागणीचा ठराव करण्यात आला.

Satara Dam
Koyna Dam News : कोयनेत गेल्यावर्षीपेक्षा १४ टक्के कमी पाणीसाठा धरणात एकूण ९०.४६ टीएमसी साठा

पालकमंत्री सुरेश खाडे, खासदार संजय पाटील, आमदार अनिल बाबर यांनी बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ठरावांची माहिती दिली. आमदार विश्‍वजीत कदम, सुमन पाटील, विक्रम सावंत, गोपीचंद पडळकर, अरुण लाड, शहाजी पाटील, अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटोळे, कार्यकारी अभियंता ज्योती देवकर, रोहित कोरे, विविध कारखान्यांचे अध्यक्ष आदी प्रमुख उपस्थित होते.

पालकमंत्री खाडे म्हणाले, की कोयना धरणातून अतिरिक्त ८.९० टीएमसी पाण्याची मागणी करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत झाला. आम्ही दोन-तीन दिवसांत मुख्यमंत्री आणि जलसंपदामंत्र्यांना एकत्रित भेटू. जिल्ह्यातील दुष्काळाची समस्या आणि पाण्याचे नियोजन त्यांच्यासमोर मांडू.

खासदार संजय पाटील म्हणाले, की कोयना धरणातून पाणी सोडण्याची मागणी करून वाट बघत बसण्याचे कारण नाही. दोनवेळा हे घडले आहे. पुन्हा भीक मागायची वेळ येऊ नये. पाणी आमचे हक्काचे आहे. जादाचे पाणी मिळाले तरच यंदाच्या दुष्काळाचा सामना करणे शक्य आहे. ते आम्ही मिळवू. दोन जिल्ह्यात वाद होऊ नये, याची खबरदारी साताऱ्यातील नेत्यांनी घेतली पाहिजे.

Satara Dam
Koyna dam Water Conditon : कोयनेतील वीजनिर्मितीच्या ३५ टीएमसीपैकी १२ टीएमसी पाणी सांगलीकरांसाठी आरक्षित करण्याची मागणी

आमदार अनिल बाबर म्हणाले, की वांग आणि तारळी धरणातून आम्ही अडीच टीएमसी हक्काचे पाणी तातडीने मागितले आहे. टेंभू, ताकारी, म्हैसाळ योजना प्रभावी व पूर्ण क्षमतेने चालल्या तरच दुष्काळाशी सामना शक्य आहे. त्यासाठी अतिरिक्त पाणी हाच पर्याय असून त्यासाठी वीज विकत घ्या, पण शेतीला पाणी द्या, हीच प्रमुख मागणी आहे. सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील यांनी टोकाकडून पाणी देत मागे या, अशी मागणी केली. त्याबाबत नियोजनाचा निर्णय झाला.

समितीचा प्रस्ताव (आकडे टीएमसीत)

योजनेचे नाव नियोजित पाणी वापर कोयना वारणा इतर स्रोत अतिरिक्त मागणी

टेंभू ११.५५ ८.९१ ० २.६४ २.००

ताकारी ४.७० ४.७० ० ० ०.९०

म्हैसाळ १२.८० ३.८० ८.५८ ० ३.०

कृष्णा नदी १८.०० १४.५९ ३.०० ० ३.००

एकूण ४७.०५ ३२.०० ११.५८ २.६४ ८.९०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com