Sarsenapati Santaji Ghorpade Sugar Factory Agrowon
ॲग्रो विशेष

Sarsenapati Santaji Ghorpade Sugar Factory : सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याकडून शेतकऱ्यांची दिवाळी गोड!, जमा केले ऊस बिलापोटी प्रती टन ५० रुपये

Additional Sugarcane bill : सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याने तोडग्यानुसार अतिरिक्त ऊस बिलापोटी प्रती टनाला ५० रुपयांप्रमाणे फरक बिल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले आहे.

Aslam Abdul Shanedivan

Kolhapur News : राज्यात विधानसभेचे वारे वाहू लागले असून सोमवार (ता.२२) पासून उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ होणार आहे. यातच आता दिवाळी आल्याने सर्वसामान्यांची दिवाळी गोड होणार अशी चर्चा रंगली आहे. याचदरम्यान सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याने तोडग्यानुसार अतिरिक्त ऊस बिलापोटी प्रती टनाला ५० रुपयांप्रमाणे फरक बिल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले आहे. याबाबतची माहिती कारखान्याचे जनरल मॅनेजर संजय घाटगे यांनी पत्रकातून दिली आहे. तर सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना कोल्हापुरचे पालकमंत्री आमदार हसन मुश्रीफ यांचा आहे.

जनरल मॅनेजर घाटगे यांनी काढलेल्या पत्रकातून, गेल्यावर्षी पालकमंत्री हसन मुश्रीफ, शेतकरी संघटना व जिल्हाधिकारी यांच्यामध्ये अतिरिक्त ऊस बिलावर तोडगा काढण्यात आला होता. त्या तोडग्याप्रमाणे अतिरिक्त ऊस बिलापोटी प्रती टनाला ५० रुपये देण्याचे मान्य केले होते. ते ५० रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहे. यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी मंगळवारपासून (ता. २२) आपापल्या बँकांशी संपर्क साधावा, असे आवाहन कारखान्याचे जनरल मॅनेजर घाटगे यांनी पत्रकात केले आहे.

तसेच या पत्रकातून गेल्या गळीत हंगामात म्हणजेच सन २०२२-२०२३ या गळीत हंगामात ‘एफआरपी’ प्रती टनाला २९०४.७९ रूपये निश्चित करण्यात आला होता. पण कारखान्याने प्रत्यक्षात प्रती टनाला रुपये ३ हजारांप्रमाणे ऊसदर दिला आहे. तसेच कारखाना प्रशासनाने यावर्षी कामगारांना बोनसपोटी १६.६६ टक्के म्हणजेच दोन पगार देखील देण्याचे ठरवले आहे.

चालू गळीत हंगाम म्हणजेच सन २०२४ – २०२५ या गळितासाठी शेतकऱ्यांनी पिकविलेला सर्व ऊस गाळपसाठी कारखान्याकडे पाठवून सहकार्य करण्याचे आवाहन देखील या पत्रकातून करण्यात आले आहे. तर यापुढेही सरसेनापती साखर कारखाना सर्वाधिक ऊस दर देण्यासाठी कटिबद्ध असेल असेही पत्रकात म्हटले आहे.

दरम्यान बिद्री साखर कारखान्याने देखील ऊस उत्पादकांना वाढीव ऊस दराचा दुसरा हप्ता देऊन दिवाळी गिफ्ट दिले आहे. कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना १०७ रुपयांचा दुसरा हप्ता अदा केला आहे. वाढीव ऊस दराच्या दुसरा हप्तापोटी १० कोटी २१ लाख रूपये ऊस पुरवठादारांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आले आहेत. तर आजअखेर ३४०७ रुपये प्रमाणे होणारी २२५ कोटी २५ लाख रुपयांची रक्कम संबंधितांना आदा केल्याची माहिती कारखाना प्रशासनाने दिली होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Monsoon Rain: मराठवाड्यात पावसाचा जोर कमीच; पूर्व विदर्भ आणि कोकणात पुढील ४ दिवस जोरदार पावसाचा अंदाज

Agrowon Podcast: गव्हाचे भाव स्थिरावले; डाळिंब तेजीत, मुग दबावात, केळीच्या दरात वाढ, उडदाचे भाव स्थिर

ZP School Admission : बोराखेडी जिल्हा परिषद शाळेत प्रवेश ‘ॲडमिशन फुल्ल’

Tree Plantation : जैवविविधता जपण्यासाठी वृक्षारोपण गरजेचे

Farmers Welfare: बच्चू कडू यांच्या मागण्यांना सरकारचा सकारात्मक प्रतिसाद; शेतकरी,मजुरांसाठी आश्वासने

SCROLL FOR NEXT