Water Crisis Agrowon
ॲग्रो विशेष

Water Crisis : पाणीटंचाईच्या मुद्यावर खारपाण पट्ट्यातील सरपंच एकवटले

Team Agrowon

Akola News : खारपाणपट्यात येणाऱ्या ६४ खेडी खांबोरा पाणी पुरवठा योजनेतून नियमित पाणी मिळावे. यासाठी आवश्‍यक असलेल्या उपाययोजना तातडीने करण्याच्या मागणीसाठी योजनेच्या लाभक्षेत्रातील गावांचे सरपंच एकवटले आहेत. संबंधित उपाययोजना या प्रशासनाकडून करून घेण्यासाठी संघर्ष करण्याचा निर्धारही संरपंच व लोकप्रतिनिधींच्या बैठकीत करण्यात आला आहे.

स्थानिक विश्रामगृहात आ. नितीन देशमुख व शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाल दातकर यांच्या मार्गदर्शनात आयोजित बैठकीला खांबोरा पाणीपुरवठा योजनेत समाविष्ट असलेल्या सर्व गावांतील सरपंच व जीवन प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते.

प्रास्ताविकात विकास पागृत यांनी पाणीपुरवठ्यातील अनियमितता, दिवाळीला सुद्धा अनेक गावात पाणी नव्हते, अनेक ठिकाणी दीड महिन्यात एखाद्या वेळेस पाणीपुरवठा होतो, धरणात पाण्याचा साठा असताना पाणी मिळत नाही, योजनेसाठी लागणारे मनुष्यबळ जिल्हा परिषदेकडे नाही, नवीन मंजूर असलेले पाइपलाइन नूतनीकरण कामे ही अर्धवट आहेत अशा विविध समस्यांचा पाढा वाचला. त्यावर बैठकीत तात्पुरता तोडगा देखील काढण्यात आला.

जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी नवीन पाइपलाइनचे काम राष्ट्रीय महामार्ग व रेल्वेच्या परवानगीसाठी थांबले होते. आता परवानगी मिळाली असून, एक दोन ठिकाणी पाइपलाइनचे काम अपूर्ण आहेत. ते येत्या महिन्याच्या आत पूर्ण करून किमान चार दिवसांतून एकवेळ पाणीपुरवठा करण्यात येईल, असे सांगितले.

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत २३ रोजी बैठक

कंत्राटी नोकर भरती व योजनेसाठी आवश्यक असलेले मनुष्यबळ उपलब्ध करून घेणे, वीजपुरवठा सुरळीत करणे अशा सर्व समस्या जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सोडविण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे. ही बैठक वेळ घेऊन २३ नोव्हेंबरला ठरवली. यासाठी सर्व पक्षभेद बाजूला सारून खारपाणपट्ट्यातील सर्व सरपंच, लोकप्रतिनिधी यांनी एकत्र यावे, असे आवाहन करण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Palm Oil Update : भारताकडून एक लाख टन पामतेल आयातीचे सौदे रद्द

M Association Election : ‘एम’ असोसिएशनच्या त्रैवार्षिक निवडणुकीमध्ये धुरगुडे पॅनेल विजयी

Rain Forecast : राज्यात पावसाची उघडीप शक्य

Soybean MSP Procurement : हमीभावाने १३ लाख टन सोयाबीनची खरेदी होणार 

Sugarcane Season : महाराष्ट्र आणि कर्नाटकचा ऊस गाळप हंगाम एकावेळी, उसाची पळवापळवी थांबणार!

SCROLL FOR NEXT