Gram Panchayat Election Agrowon
ॲग्रो विशेष

Gram Panchayat Election : खेडमधील १८ ग्रामंपचायतींच्या सरपंचपदाची सोडत

Sarpanch Post Lottery : विधानसभेच्या निवडणुकीनंतर पुन्हा सहकारी संस्था आणि ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे.

Team Agrowon

Pune News : विधानसभेच्या निवडणुकीनंतर पुन्हा सहकारी संस्था आणि ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. खेड तालुक्यातील १८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत येत्या गुरुवारी (ता. २७) पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात काढण्यात येणार असल्याची माहिती खेडच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी दिली.

ग्रामविकास विभाग मंत्रालय मुंबई यांनी उच्च न्यायालय, मुंबई खंडपीठ, नागपूर येथे दाखल रिट याचिका क्र.४६७१/२०२३ प्रकरणी न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार ५ मार्च २०२० च्या अधिसुचनेद्वारे निश्चित केलेले सरपंचपदाचे आरक्षण अधिसुचनेच्या उर्वरित कालावधीतील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी फेरआरक्षण निश्चित करणे आवश्यक असल्याने १ जानेवारी २०२४ ते ४ मार्च २०२५ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीचे सरपंचपदाचे आरक्षसोडत निश्चित करण्यात आली आहे.

पुणे जिल्ह्यातील बिगर अनुसूचित क्षेत्रातील १ जानेवारी २०२४ ते ४ मार्च २०२५ या कालावधीतील ग्रामपंचायतीकरिता अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग, महिला राखीव, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग यातील महिलांसह जिल्हास्तरावर सरपंच पदाकरिता आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे.

आरक्षण सोडतीकामी खेड तालुक्यातील सर्व आजी व माजी जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, सर्व राजकीय पक्षाचे प्रमुख, ग्रामस्थ यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन खेड तहसीलदार कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

या ग्रामपंचायतींची निघणार आरक्षण सोडत :

खराबवाडी, जउळके खुर्द, कोहींडे बुद्रुक, सोळू, वडगाव घेनंद, धामणे, गुळाणी, रौंधळवाडी, आसखेड बुद्रुक, आंबेठाण, वाशेरे, सायगाव, कडाचीवाडी, बोरदरा, पाईट, कोये, खालुंब्रे, टेकवडी.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT