Bribe Agrowon
ॲग्रो विशेष

Sarpanch Bribe : सोग्रसचा सरपंच, उपसरपंच लाच घेताना ताब्यात

Anti-Bribery Department : पाण्याच्या टाकीचे बिल काढण्यासाठी कंत्राटदारांकडून ३० हजार रुपयांची लाच स्वीकारताना सोग्रस (ता. चांदवड) येथील सरपंच व उपसरपंचाला लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने पकडले.

Team Agrowon

Nashik News : पाण्याच्या टाकीचे बिल काढण्यासाठी कंत्राटदारांकडून ३० हजार रुपयांची लाच स्वीकारताना सोग्रस (ता. चांदवड) येथील सरपंच व उपसरपंचाला लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने पकडले. सरपंच भास्कर पुंडलिक गांगुर्डे (वय ५५) व उपसरपंच प्रकाश चंद्रभान गांगुर्डे (वय ४५) अशी लाच घेणाऱ्या लोकप्रतिनिधींची नावे आहेत.

तक्रारदाराच्या मित्राने जिल्हा परिषदेअंतर्गत सोग्रस येथे पाण्याच्या टाकीचे बांधकाम पूर्ण केले होते. झालेल्या बांधकामाचे बिल अद्याप मिळालेले नव्हते. हे बिल काढण्यासाठी तक्रारदाराला अधिकारपत्र प्राप्त होते.

पाण्याच्या टाकीचे बांधकामाचे बिल मंजूर करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या हस्तांतर पत्रावर सही करण्यासाठी सरपंच व उपसरपंचांनी कंत्राटदाराकडे ५० हजार रुपयांची मागणी केली होती. तक्रारीनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचला.

सरपंच व उपसरपंचाने सही करून पाठविण्यासाठी पंचासमक्ष तक्रारदाराकडे तडजोडीअंती ३० हजार रुपयांच्या लाचेची रक्कम स्वीकारण्याचे मान्य करून ती पंचासमक्ष स्वीकारली. त्या वेळी त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले.

अधीक्षक शर्मिष्ठा घारगे वालावलकर, अप्पर अधीक्षक माधव रेड्डी, उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक अनिल बडगुजर, दीपक पवार, संजय ठाकरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

शासकीय यंत्रणेचा काणाडोळा

जिल्हा परिषद व ग्रामपंचायतीच्या कामांमध्ये आपल्याच पसंतीच्या ठेकेदारांना कामे देण्याची पद्धत रूढ आहे. अनेक कामांचे ई-टेंडर झाले तरीही ‘मॅनेज’ असलेल्या कंत्राटदारांनाच कामे दिली जातात.

अशा कंत्राटदारांकडून अशा प्रकारे कमी-जास्त प्रमाणात पैशांची मागणी होत असल्याचीही तालुक्यात चर्चा आहे. टक्केवारीच्या कामांच्या पैशांच्या आशेपोटी या कामांची गुणवत्ताही ढासळलेली असते. या सर्व प्रकाराकडे प्रशासकीय यंत्रणेचाही काणाडोळा होतो, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PM Kisan 21st Installment: 'या' दिवशी मिळू शकतात पीएम किसानचे २ हजार रुपये?; २१ व्या हप्त्याबद्दल महत्त्वाची माहिती

Monsoon Rain: परभणीत ११४७.५ मिमी, तर हिंगोलीत १३२०.६ मिमी पाऊस

Inspiring Farmer Story: कळसूबाईच्या जंगलातील संसारशाळा

Farmer Subsidy: अडीच हजार शेतकरी अनुदानापासून वंचित

Cashew Farming: नवीन काजू बागेत अन्नद्रव्ये व्यवस्थापनावर भर

SCROLL FOR NEXT