Chandigarh News : संयुक्त किसान मोर्चाने (एसकेएम) कृषी विपणनावरील राष्ट्रीय धोरण आराखड्याचा (एनपीएफएएम) मसुदा नाकारला आहे. तसेच सोमवारी (ता. १३) या मसुद्याच्या प्रति जाळून निषेध व्यक्त केला जाणार आहे. तसेच २६ जानेवारीला पंजाबमध्ये ट्रॅक्टर मार्च काढण्याचे जाहीर केले.
गुरुवारी मोगा येथे आयोजित केलेल्या महापंचायती दरम्यान वरील घोषणा केल्या. या वेळी पंजाबच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने शेतकरी एकत्र आले होते. मोगा येथे झालेल्या महापंचायती वेळी कृषी विपणनावरील राष्ट्रीय धोरण आराखडा नाकारण्याचा ठराव केला गेला. शेतकऱ्यांच्या विविध मागण्या लक्षात घेऊन एकता ठराव मंजूर केला गेला.
एसकेएमची ६ सदस्यीय एकता समिती आज (ता. १०) खनौरी आणि शंभू सीमेवर एकता निर्माण करण्यासाठी शपथ घेणार आहे. या भेटीदरम्यान १५ जानेवारी रोजी पतियाळा येथे सहा सदस्यीय समितीने दोन्ही मंचांना संयुक्त बैठकीसाठी आमंत्रित केले आहे.
‘डल्लेवाल यांच्या प्रकृतीची जबाबदारी केंद्र सरकारवर’
बेमुदत उपोषणाला बसलेले शेतकरी नेते जगजितसिंग डल्लेवाल यांची प्रकृती दिवसेंदिवस ढासळत असून, त्यांच्या या स्थितीला केंद्र सरकार, विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान जबाबदार आहेत, असे ‘एसकेएम’ने या वेळी सांगितले. त्यांनी केंद्र सरकारकडे दाद मागितली.
डल्लेवाल यांच्याबाबत काही अनुचित प्रकार घडल्यास आंदोलन करण्याचा इशाराही मोर्चाने दिला. डल्लेवाल यांच्याबाबतची संपूर्ण जबाबदारी केंद्र सरकारवर असेल. भविष्यातील कार्यक्रम ठरवण्यासाठी एसकेएम २४ आणि २५ जानेवारी रोजी दिल्लीत राष्ट्रीय परिषदेची बैठक घेणार आहे. डल्लेवाल गेल्या ४५ दिवसांपासून उपोषण करीत आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.