
Dallewal Protest : संयुक्त किसान मोर्चाचे जगजित डल्लेवाल ४३ दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले आहेत. त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत असून कोणतीही वैद्यकीय मदत घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने डल्लेवाल यांच्या मागण्या मागण्या कराव्यात, अशी मागणी शेतकरी नेते करत आहेत. हमीभाव कायद्यासह विविध मागण्यांसाठी २६ नोव्हेंबरपासून खनौरी सीमेवर डल्लेवाल उपोषणाला बसले आहेत. मात्र केंद्र सरकारकडून अद्यापही त्यांच्या मागण्यांची दखल घेतलेली नाही. त्यामुळे डल्लेवाल यांच्यासोबत अनुचित प्रकार घडल्यास त्यासाठी केंद्र सरकार जबाबदार असेल, असा इशारा शेतकरी नेत्यांनी दिला आहे.
सोमवारी संध्याकाळी डल्लेवाल यांची तब्येत बिघडली आहे . त्यांचा रक्तदाब कमी झाला असून त्यांना उलट्या होऊ झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. शेतकरी नेते अभिमन्यु कोहर यांनी यावरून केंद्र सरकारवर जोरदार टिका. कोहर म्हणाले, "डल्लेवाल यांना काही झालं तर केंद्रातील विद्यमान सरकारच्या कार्यकाळावर डाग लागेल. जो कधीही धुतला जाणार नाही. इंग्रजाच्या राजवटीतही एखादी व्यक्ती आमरण उपोषणाला बसली की, इंग्रज सरकार त्याकडे लक्ष देत होते," असं म्हणत कोहर यांनी सरकारवर घणाघाती टिका केली.
केंद्र सरकारच्या भूमिकेविरुद्ध देशभरात भाजप सरकारचे पुतळे शेतकरी संघटनांकडून जाळण्यात येणार आहेत. त्यामुळे शेतकरी आंदोलन तापण्याची चिन्हं दिसू लागली आहेत. कोहर म्हणाले, " १० जानेवारी रोजी देशभरात भाजप सरकारचे पुतळे जाळण्यात येणार आहेत. डल्लेवाल देशातील शेतकऱ्यांचं भविष्य वाचवण्यासाठी लढत आहेत. केंद्र सरकारच्या विरोधात २६ जानेवारीला देशभरात शेतकरी ट्रॅक्टर घेऊन रस्त्यावर उतरणार आहेत." असंही कोहर यांनी सांगितलं.
दरम्यान, संयुक्त किसान मोर्चा अराजकीय आणि किसान मजूर मोर्चा १३ फेब्रुवारीपासून २०२३ पासून शंभु आणि खनौरी सीमेवर आंदोलन करत आहेत. अलीकडेच सोमवारी सर्वोच्च न्यायलयाने नियुक्त केलेल्या समितीने डल्लेवाल यांची भेट घेतली आहे. परंतु डल्लेवाल शेतकरी मागण्यांवरून उपोषणावर ठाम आहेत.
डल्लेवाल यांच्या उपोषणाबाबत काँग्रेसने केंद्र सरकारवर टिका केली आहे. काँग्रेसने आपल्या एक्स हँडलवर लिहिलं आहे की, "शेतकरी नेते डल्लेवाल यांच्या आमरण उपोषणाचा आज ४४ वा दिवस आहे. एमएसपीची हमी, कर्जमाफी यासह अनेक मागण्यांसाठी ते २६ नोव्हेंबरपासून खनौरी सीमेवर उपोषण करत आहेत, मात्र नरेंद्र मोदींनी अद्याप डल्लेवालजींची दखल घेतली नाही. त्याचवेळी देशाचे कृषिमंत्रीही पीएम मोदींचा मार्ग अवलंबत आहेत आणि दर मंगळवारी शेतकऱ्यांना भेटतात असे उघड खोटे बोलत आहेत. यावरून नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारला शेतकऱ्यांबद्दल सहानुभूती नसल्याचे दिसून येते. शेतकऱ्यांच्या असहायतेची आणि समस्यांची त्यांना पर्वा नाही. पण... ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही नरेंद्र मोदींच्या उद्दामपणामुळे ७०० हून अधिक शेतकरी शहीद झाले आहेत." अशी टिकाही कॉँग्रेसने केली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.