Palkhi Sohala 2024 Agrowon
ॲग्रो विशेष

Palkhi Sohala 2024 : आळंदी रथाची, मानाच्या बैलांची चाचणी

Ashadi Wari 2024 : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील माउलींच्या पादुका ठेवण्यात येणाऱ्या रथाची दुरुस्ती व डागडुजीची कामे पूर्ण झाली आहेत.

Team Agrowon

Pune News : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील माउलींच्या पादुका ठेवण्यात येणाऱ्या रथाची दुरुस्ती व डागडुजीची कामे पूर्ण झाली आहेत. पालखी सोहळ्याच्या काळात हा रथ व्यवस्थित चालावा यासाठी त्याला मानाची बैलजोडी जुंपून त्याची दोनवेळा चाचणी केल्याची माहिती आळंदी देवस्थानचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी दिली.

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान आळंदीतील देऊळवाड्यातून शनिवारी (ता.२९) होणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पालखी सोहळा पुण्याकडे ३० जून आणि १ जुलै रोजी मुक्कामी जाणार आहे. या वेळी माउलींची पालखी रथामध्ये ठेवून रथ मानाच्या बैलांच्या साहाय्याने ओढला जातो.

दरम्यान, रथाला असलेल्या चांदीला झळाळी आणण्यासाठी तसेच चाके व रंगरंगोटीची कामे पूर्ण झाली आहेत. रथावरील विद्युत व्यवस्था, सीसीटीव्ही कॅमेरेही दुरुस्त करून ठेवण्यात आली आहेत.

दरम्यान, रथाची चाचणी करण्यासाठी सहादू कुऱ्हाडे यांची मानाची बैलजोडी जुंपून विश्रांतवाडी ते आळंदी आणि चाकण घाट ते आळंदी अशी दोन वेळा वेगवेगळ्या मार्गावर चाचणी करण्यात आली.

रथ उत्तम रीतीने चालत आहे. तर, बैलांचाही सराव नियमित असून वारीसाठी बैलजोडी आणि रथ सज्ज असल्याचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी सांगितले. रथाची चाचणी करण्यासाठी देवस्थानचे कर्मचारी, बैलजोडी मालक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी, पोलिस कर्मचारी उपस्थित होते.

यंदाच्या वर्षी माउलींच्या रथाला जोडण्यात येणाऱ्या सहादू कुऱ्हाडे यांच्या बैलजोडीतील सवाद्य मिरवणूक आज (ता.२३) सायंकाळी चार वाजता गोपाळपुरा स्वामींच्या मठापासून होणार आहे. ही मिरवणूक चाकण चौकमार्गे प्रदक्षिणा रस्ता आणि महाद्वारात येणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Jowar Production: मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांत ज्वारी उत्पादकतेत वाढ

Fruit Rate Drops: खानदेशात केळी, कलिंगड दरात सातत्याने घसरण

Tumeric Production: राज्यात हळद उत्पादन स्थिरावणार

Maharashtra Summer Weather: उन्हाच्या चटक्यात वाढ; पावसाचीही शक्यता

Unseasonal Rain: अवकाळीचा कहर, शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी, आंबा, काजू पिकाच्या नुकसानीची भीती

SCROLL FOR NEXT