Oxygen Park Agrowon
ॲग्रो विशेष

Oxygen Park : चिखुर्डा प्राथमिक आरोग्य केंद्रात साकारले संजीवनी ऑक्सिजन पार्क

Tree Plantation : वृक्ष लागवड केलेल्या परिसराचे ‘संजीवनी ऑक्सिजन पार्क’ असे नामकरण करण्यात आले असून झाडांमुळे केंद्रातील वातावरण बदलून गेले आहे.

Team Agrowon

Latur News : कोरोना काळात सर्वांनाच ऑक्सिजनचे महत्त्व पटले. वृक्ष लागवड व संवर्धनातून हे महत्त्व कायम लोकांच्या लक्षात आणून देण्यासाठी चिखुर्डा (ता. लातूर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी ग्रामपंचायतीच्या मदतीने गेल्या तीन वर्षांत तब्बल सात हजार वृक्षांची जोपासना केली आहे.

वृक्ष लागवड केलेल्या परिसराचे ‘संजीवनी ऑक्सिजन पार्क’ असे नामकरण करण्यात आले असून झाडांमुळे केंद्रातील वातावरण बदलून गेले आहे. शुक्रवारी (ता. १६) पार्कमधील वृक्षांचा वाढदिवस मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.

वातावरणातील बदलाचा मानवी आरोग्यावर मोठा परिणाम होतो. हे ओळखून जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्राच्या परिसरात वृक्ष लागवडीचे नियोजन केले आहे. केंद्रात येणाऱ्या रुग्णाला अल्हाददायी वाटावे व पर्यावरण संतुलनाच्या कार्यात योगदान देता यावे, हा त्यामागील हेतू आहे.

चिखुर्डा केंद्रात तीन वर्षापासून ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने वृक्ष लागवड करण्यात आली. मियावाकी व बिहार पॅटर्ननुसार चिंच, वड, पेरू, लिंब, साग, आंबा, शेवगा, निलगिरी, सीताफळ आदी सात हजार वृक्षांची लागवड करून त्यांचे नियमित संगोपन करण्यात येत आहे. वृक्ष लागवडीचे श्री. सागर यांनी कौतुक करत संजीवनी ऑक्सीजन पार्कची संकल्पना पर्यावरणपूरक असल्याचे नमूद केले. पार्कमधील झाडांचा वाढदिवस केक कापून व वृक्षांना हार घालून साजरा करण्यातआला.

या उपक्रमात योगदान देणाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. या वेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच. व्ही. वडगावे, डॉ. अर्चना पंडगे, विलास सहकारी साखर कारखन्याचे संचालक रवी काळे, सरपंच रंजना कदम, वैद्यकीय अधिकारी डॉ. तोरणेकर, डॉ. सोळंके, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. गव्हाणे, ग्रामसेवक भुजबळ यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व सर्व कर्मचारी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Banana Market: खानदेशात केळीच्या आवकवाढीस सुरुवात

local Body Election: पुण्यात ३६.९५, पिंपरी चिंचवडमध्ये ४०.९ टक्के साडेतीनपर्यंत मतदान

Local Body Election: ‘झेडपी’, पंचायत समितीच्या निवडणुकीत राजकारण तापणार

Grape Export: द्राक्ष निर्यातीस कासवगतीने सुरुवात

Agriculture Officer: शेतकऱ्याला मारहाण करणाऱ्या तालुका कृषी अधिकाऱ्याच्या निलंबनाची शिफारस

SCROLL FOR NEXT