Sangli Rain Condition agrowon
ॲग्रो विशेष

Sangli Rain Condition : सांगलीकरांना रब्बी पिकासाठी दिलासा मिळणार, जोरदार पावसाची शक्यता

Sangli Heavy Rain : सांगली जिल्ह्यात येत्या चार दिवसांनी वातावरणात मोठ्या बदलाची शक्यता हवामान अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.

sandeep Shirguppe

Sangli Rain : सांगली जिल्ह्यात येत्या चार दिवसांनी वातावरणात मोठ्या बदलाची शक्यता हवामान अभ्यासकांनी व्यक्त केली आहे. जिल्ह्यात शनिवारपासून (ता. २५) तीन दिवस हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.

सांगली जिल्ह्यातील फुलोरासाठी तयार द्राक्षबागांना फटका बसण्याचा अंदाज आहे. रब्बी हंगामातील शाळू, हरभरा पिकांसाठी बदलत्या वातावरणाचा फायदा होणार आहे.

बंगालच्या उपसागरातील समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान अधिक असल्याने कमी दाबाचे क्षेत्र विकसित होण्यासाठी अनुकूल वातावरण आहे. बुधवारी (२२) चेन्नईजवळ कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय राहील. त्यामुळे बऱ्याच प्रमाणात बाष्पयुक्त वारे आपल्या विभागात येतील. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे ढगांमध्ये रूपांतर होईल.

पावसासाठी अनुकूल वातावरण तयार होईल. गुरुवारपासून (२३) ढगांची गर्दी वाढेल. पावसासाठी अनुकुल वातावरण तयार होऊ लागेल. मोठा अथवा जोरदार पाऊस होईल, असे वाटत नाही. मात्र हलक्या सरी बहुतांश ठिकाणी राहू शकतात.

सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा परिसरात शक्यतो पश्चिमेकडील भागात हलक्या सरी होतील. सांगली, सोलापूर परिसरात शनिवारी व रविवारी (२६) पावसाची शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Hingoli Crop Loan : हिंगोली जिल्ह्यात पीककर्ज वाटपाचे ३५.१६ टक्के उद्दिष्ट साध्य

Rabi Season : पाच लाख ५४ हजार हेक्टरवर रब्बीत पेरणीचे कृषी विभागाकडून नियोजन

District Co-operative Bank : जिल्हा बँकेवर प्रशासक नियुक्तीच्या हालचाली

Amravati Rain Deficit : अमरावती जिल्ह्यात २२ दिवसांपासून पावसाचा खंड

Crop Damage Panchnama: पिकांवर रोटाव्हेटर फिरवू नका, नुकसानीच्या पंचनाम्यासाठी पुरावे राहतील, सहकारमंत्र्यांचे शेतकऱ्यांना आवाहन

SCROLL FOR NEXT