Sand  Agrowon
ॲग्रो विशेष

Illegal Sand Mining : वाळू तस्करांची नदीपात्रावर वक्रदृष्टी

Illegal Mining: शेवगाव परिसरातील नद्यांवरील बंधाऱ्यातील पाणी आटताच वाळू तस्करांनी अवैध वाळू उपशास नव्या जोमाने सुरुवात केली.

Team Agrowon

Illegal sand Mining in Shevgaon : परिसरातील नद्यांवरील बंधाऱ्यातील पाणी आटताच वाळू तस्करांनी अवैध वाळू उपशास नव्या जोमाने सुरुवात केली. ढोरा, नंदिनी, सकुळा, अवनी या नदी पात्रातून बेसुमार वाळूउपसा सुरू झाला असून त्यामुळे पर्यावरणाचे अतोनात नुकसान होत आहे.

महसूल व पोलिस प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे तस्करांकडून नदीपात्र वाळूसाठी अक्षरश: ओरबडले जात आहेत. सर्वसामान्यांसाठी सहाशे रुपये प्रति ब्रास या वाळू धोरणास एक मेपासून सुरुवात झाली असली तरी त्यापूर्वीच नदीपात्र रिकामे करण्याचा सपाटा सुरू आहे.

परिसरातील वाघोली ते जोहरापूरदरम्यान वाहणाऱ्या ढोरानदीपात्रावर बंधाऱ्यांची मालिका आहे. उन्हाळ्याची चाहुल लागताच त्यातील पाणी झपाट्याने कमी होऊन नदीपात्र कोरडे ठाक पडले आहे.

तसेच शेतातील पिके निघाल्याने जागोजागी नदीपात्रात जाण्यासाठी रस्ते देखील उपलब्ध झाले आहेत.

त्याचा फायदा घेऊन वाघोली, वडुले, ढोरजळगाव, आखातवाडे, मळेगाव, सामनगाव, लोळेगाव, जोहरापूर येथील ढोरानदीतून, आव्हाणे, बऱ्हाणपूर, दिंडेवाडी येथील आवनी नदीपात्रातून, आखेगाव, खरडगाव भगुर, वरूर, वडुले बुद्रुक येथील नंदिनीतून तर अमरापूर फलकेवाडी येथून सकुळा नदीतून रात्रंदिवस ट्रॅक्टर, डंपर व जेसीबीच्या साह्याने बेसुमार वाळू उपसा सुरू झाला आहे. त्यामुळे कोरड्याठाक पडलेल्या पात्रातून व परिसरातील पाण्याची पातळी झपाट्याने खालावत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: कोकण, घाटमाथा, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज

Drought Situation: दुष्काळस्थितीत यंत्रणांनी सतर्क राहावे : कृषिमंत्री भरणे

Ghodganga AGM Controversy: ‘घोडगंगा’च्या सभेत घोषणाबाजीने गोंधळ

Illegal Water Extraction: तलाव आटले, तरीही अवैध पाणीउपसा सुरू

Farmers Protest: २३ सप्टेंबरला मंत्र्यांना काजू, बदाम पाठवून राज्यभर आंदोलन, किसान सभेची घोषणा

SCROLL FOR NEXT