Milk Measurement Corruption agrowon
ॲग्रो विशेष

Milk Measurement Corruption : दुधाच्या मोजमापातील भ्रष्टाचार उघड करणे गुन्हा आहे का? संभाजी ब्रिगेडचा पलटवार

Sambhaji Brigade kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यात दुधाच्या मोजमापावर अंकुश आणण्यासाठी मागच्या काही महिन्यांपासून संभाजी ब्रिगेडकडून आंदोलन सुरू आहे.

sandeep Shirguppe

Corruption Milk Measurement : कोल्हापूर जिल्ह्यात दुधाच्या मोजमापावर अंकुश आणण्यासाठी मागच्या काही महिन्यांपासून संभाजी ब्रिगेडकडून आंदोलन सुरू आहे. दरम्यान यावर जिल्ह्यातील दूध संस्था आक्रमक होत संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष रुपेश पाटील यांच्यावर आरोप केले आहेत. याबाबत रुपेश पाटील यांनी कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संस्था कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष केरबा पाटील यांना प्रत्युत्तर दिले आहे.

त्यांनी दिलेल्या निवेदनानुसार, दुधाच्या मोजमापातील भ्रष्टाचार उघड करणे गुन्हा आहे का? काळे धंदे वगैरे लवकर जाहीर करा, एका पावलाने देखील मागे सरकणार नाही, या शब्दांत संभाजी ब्रिगेडचे रूपेश पाटील यांनी कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संस्था कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष केरबा पाटील यांना प्रत्युत्तर दिले.

दूध वजनकाट्यासंबंधी विचारणा केल्यास काळे धंदे बाहेर काढू, असा इशारा केरबा पाटील यांनी संघटनेच्या सभेत दिला होता. या पार्श्वभूमीवर रूपेश पाटील यांनी पत्रक काढून भूमिका मांडली. रूपेश पाटील यांनी पत्रकात म्हटले आहे, माझ्या घरी जनावरे नाहीत, मी दूध उत्पादक नाही म्हणून मला दूध आंदोलन करायचा अधिकार नाही, असे प्रस्थापित मंडळी बोलत आहेत. या लढ्यात एकटा पडलोय, असे समजून सतत एक कळप टीका करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न होत आहे.

जी मंडळी माझ्यावर टीका करतात हेच लोक दुधाची काटामारी करण्यात, शेतकऱ्यांकडून जादा दूध घेऊन फसवणूक करण्यात आघाडीवर आहेत. यांनी माझे काळे धंदे बाहेर काढण्याची धमकी दिली. पांढरे दूध पिणारे काळे बोके शेतकऱ्यांकडून ठेचले जाणार आहेत. तुम्ही शेतकऱ्यांना अडाणी ठेवून काटामारी करताय. आम्ही जागृती करतोय हा जर गुन्हा असेल तर शिक्षा भोगायला तयार आहे, या शब्दांत पाटील यांनी समाचार घेतला.

काय म्हणाले होते केरबा पाटील

दूध संस्थांशी संबंध नसणाऱ्यांनी दहा मिली अॅक्युरेसीसंबंधी तक्रारी करू नये. दूध संस्थांत वजन काटा तपासणीसाठी येऊ नये. अन्यथा त्यांचे सगळे काळे धंदे बाहेर काढावे लागतील, असा इशारा कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संस्था कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष केरबा पाटील यांनी २४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत दिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nashik-Pune Highway : पुणे-नाशिक महामार्ग प्रकल्पात शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही

MNS Protest : शेतकरी आणि कर्मचाऱ्यांसह मनसेचा ‘पन्नगेश्‍वर’वर मोर्चा

Paddy Transplantation : पावसाअभावी सिंधुदुर्गात भातरोप पुनर्लागवड रखडली

Mulching Farming : शेतकऱ्यांची पॉली मल्चिंगला मागणी

Groundnut Sowing : खानदेशात भुईमूग लागवडीस गती

SCROLL FOR NEXT