Onion Seeds  Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Seed Sale : साडेचार टन कांदा बियाण्याची विक्री

Team Agrowon

Nagar News : महात्मा फुले कृषी विद्यापीठात दोन दिवसांपासून कांदा बियाण्यांची विक्री सुरू आहे. आतापर्यंत साडेचार टन कांदा बियाण्याची विक्री झाली असून, त्यातून सुमारे ६७ लाखांची उलाढाल झाली असल्याची माहिती विद्यापीठातून देण्यात आली.

महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या कांदा बियाण्याला चांगली मागणी असते. दोन दिवसांपूर्वी यंदाच्या फुले समर्थ कांदा बियाण्यांच्या विक्रीला कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांच्या उपस्थितीमध्ये सुरुवात झाली. संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. श्रीमंत रणपिसे, कुलसचिव अरुण आनंदकर, नियंत्रक सदाशिव पाटील, पदव्युत्तर महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. विठ्ठल शिर्के, निम्नस्तर कृषी शिक्षणाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे उपस्थित होते.

नाशिकमधील दुगाव (ता. चांदवड) येथे हिरामण मंडलीक व राहुरी तालुक्यातील ताहराबाद येथील श्रीमती मंदाकिनी औटी यांना मान्यवरांच्या हस्ते कांदा बियाणे देऊन विक्री सुरू करण्यात आली. या वेळी बियाणे खरेदीसाठी आलेल्या शेतकऱ्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था बियाणे विभागाच्या वतीने करण्यात आलेली आहे.

या वेळी पुणे कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुनील मासाळकर, उद्यानविद्या विभाग प्रमुख डॉ. बी. टी. पाटील, प्रसारण केंद्राचे प्रमुख डॉ. पंडित खर्डे, बियाणे विभागातील शास्त्रज्ञ डॉ. उदय काचोळे, डॉ. राजेंद्र क्षीरसागर, कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राचे व्यवस्थापक डॉ. दत्तात्रय पाचारणे, डॉ. बी. टी. शेटे, डॉ. कैलास गागरे, डॉ. अनिल सूर्यवंशी, सुरक्षा अधिकारी श्री. गोरक्ष शेटे व बियाणे विभागातील अधिकारी व कर्मचारी या वेळी उपस्थित होते.

बियाण्याची विविध ठिकाणी विक्री

कांदा बियाणे विक्रीच्या सुलभतेसाठी विद्यापीठाने या वर्षी कांदा उत्पादकांना नाशिक, नगर व सातारा जिल्ह्यांतील कृषी विद्यापीठाच्या अनेक केंद्रांमध्ये बियाणे विक्री व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये नाशिक जिल्ह्यातील कृषी संशोधन केंद्र, निफाड, कांदा लसूण व द्राक्ष संशोधन केंद्र, पिंपळगाव बसवंत, कृषी संशोधन केंद्र, लखमापूर तसेच कृषी महाविद्यालय, मालेगाव या ठिकाणी विक्री करण्यात येत आहे.

सातारामध्ये कृषी संशोधन केंद्र, बोरगाव, कृषी विज्ञान केंद्र, धुळे, कृषी महाविद्यालय, पुणे येथेही विक्री होत आहे. नगर जिल्ह्यातील राहुरी येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ, कृषी महाविद्यालय, हळगाव, जामखेड व नगर-पुणे रस्त्यावरील कृषी संशोधन केंद्र, चास या ठिकाणी फुले समर्थ बियाणे विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. पहिल्या दिवशी राहुरी येथे २४१७ किलो व उर्वरित दहा जिल्ह्यांतील केंद्रामध्ये २०८३ किलो असे मिळून साडेचार टन कांदा बियाणे विक्री झाले, असे प्रमुख शास्त्रज्ञ बियाणे डॉ. आनंद सोळंके यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Farming : अतिवृष्टीमुळे कांदा रोपवाटिकांची अवस्था बिकट

Soybean Procurement Center : मंचर बाजार समितीमध्ये लवकरच सोयाबीन खरेदी केंद्र

Pune Rain : धरणक्षेत्रांत पावसाच्या जोरदार सरी

National Water Awards : पाचव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांवर महाराष्ट्राची छाप

Greenhouse Project Inaguration : वाण विकासासाठी हरितगृह फायदेशीर : डॉ. पाटील

SCROLL FOR NEXT