Pune News: राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागाकडून दिला जाणारा यशवंतराव चव्हाण वाङ्मय पुरस्कार २०२३ सकाळ प्रकाशनाच्या प्रकाश पवार लिखित ‘राजमाता जिजाऊ’ आणि ललिता बोरा लिखित ‘अन्नप्रक्रिया उद्योग’ या दोन पुस्तकांना प्राप्त झाला आहे.
राज्य वाङ्मय पुरस्काराच्या प्रौढ वाङ्मय-इतिहास विभागातील ‘शाहू महाराज पुरस्कार’ प्रकाश पवार यांच्या ‘राजमाता जिजाऊ : सकलजनवादी क्रांतीच्या शिल्पकार‘ या पुस्तकाला मिळाला आहे. तसेच प्रौढ वाङ्मय-शेती व शेतीविषयक पूरक व्यवसाय यासाठीचा ‘वसंतराव नाईक पुरस्कार’ स्व.डॉ. ललिता विजय बोरा यांच्या ‘अन्नप्रक्रिया उद्योग : फळे भाज्या प्रक्रिया-तंत्रज्ञान आणि उद्योग’ पुस्तकाला प्राप्त झाला आहे.
प्रकाशन व्यवसायात आपले वेगळेपण सिद्ध करत सकाळ प्रकाशनाने शेती व शेतीपूरक व्यवसायाशी निगडित पुस्तके प्रकाशित करण्यास नेहमीच प्राधान्य दिले आहे. त्यामुळे या विभागात तिसऱ्यांदा हा पुरस्कार प्राप्त होत आहे. गेल्या वर्षी मंदार मुंडले लिखित शेती ‘रेसिड्यू फ्री’च!
या पुस्तकास आणि त्याआधी ‘तांत्रिक दृष्टिकोनातून सेंद्रिय शेती’ या प्रशांत नाईकवाडी यांच्या पुस्तकास २०१७मध्ये हा पुरस्कार मिळाला होता. ऐतिहासिक वा चरित्रात्मक पुस्तकांमध्येही वेगळे संदर्भ आणि व्यक्तिमत्त्वाचे विविधांगी पैलू वाचकांसमोर मांडण्याचा प्रयत्न सकाळ प्रकाशन सातत्याने करत आहे.
डॉ. ललिता बोरा यांचे सप्टेंबर २०२३ मध्ये अपघाती मृत्यू झाला होता. प्रक्रिया उद्योगात संशोधन, प्रशिक्षण आणि विस्तार कार्यात त्यांनी मोलाचे योगदान दिले होते.
राजमाता जिजाऊ : जात-धर्म-लिंग-वंश-भाषा या सर्वांपलीकडे जात लोककल्याणकारी स्वराज्याचा पाया घालणाऱ्या ‘जिजाऊ’ यांच्या चरित्राची अभिनव मांडणी करणारे पुस्तक!
लेखक : प्रकाश पवार । पृष्ठे : २५६ । मूल्य : ४९९
अन्नप्रक्रिया उद्योग : कृषिप्रक्रिया उद्योगाच्या पायाभूत तंत्रज्ञानापासून अत्याधुनिक तंत्रज्ञानापर्यंत सर्व घटकांचा अंतर्भाव असलेले आणि फूड प्रोसेसिंगचे १०० टक्के प्रशिक्षण देणारे पुस्तक!
लेखिका : डॉ. ललिता बोरा । पृष्ठे : १८४ । मूल्य : ७५०
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.