Sant Nivruttinath Yatra Agrowon
ॲग्रो विशेष

Sant Nivruttinath Maharaj Yatra 2024 : टाळ-मृदुंगाच्या तालात त्र्यंबकनगरी दुमदुमली

Sant Nivrittinath Maharaj Yatra Trimbakeshwar 2024 : संतश्रेष्ठ श्री निवृत्तिनाथ महाराज हे वारकरी संप्रदायाचे आद्य प्रवर्तक आहेत. त्यांचा यात्रोत्सव पौष वद्य एकादशीस साजरा होत असतो.

मुकूंद पिंगळे

Trimbakeshwar News : संतश्रेष्ठ श्री निवृत्तिनाथ महाराज हे वारकरी संप्रदायाचे आद्य प्रवर्तक आहेत. त्यांचा यात्रोत्सव पौष वद्य एकादशीस साजरा होत असतो. यंदा वारकऱ्यांनी नाथांच्या चरणी लीन होत भक्तीची लाट पाहायला मिळाली. वारकरी हातात भगव्या पताका, हाती टाळ मृदुंगाच्या तालात दंग झालेल्या वारकऱ्यांनी त्र्यंबकनगरी दुमदुमली.

संत श्री निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थानच्या वतीने यंदा हा सोहळा भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. नगर, धुळे, जळगाव, ठाणे, पालघर, पुणे व नाशिक जिल्ह्यांतील शेकडो दिंड्यामध्ये मोठ्या संख्येने वारकरी व भाविक सहभागी झाले होते. डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन महिलांचा उत्साह अवर्णनीय होता. संत निवृत्तीनाथ महाराज पौष वारी यात्रेनिमित्त समाधीस्थळ येथे पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते मंगळवारी (ता. ६) पहाटे महापूजा करण्यात आली.

(ॲग्रो विशेष)

यावेळी नगर जिल्ह्यातील राहता येथील वारकरी दाम्पत्य मोहन धानेकर यांचा सन्मान करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यात्रोत्सवात वारकऱ्यांना सोयी-सुविधा देण्यासाठी समाधी संस्थानास कायमस्वरूपी निधी उपलब्ध करून देण्याचे जाहीर केले आहे.

पालकमंत्र्यांनी राज्यावरील दुष्काळाचे सावट दूर होऊ दे अशी प्रार्थना नाथांच्या चरणी केली. तसेच वारकरी व भाविकांना देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांची पाहणी केली. यात्रोत्सवाचे चांगले नियोजन केल्याबद्दल पालकमंत्र्यांनी विश्वस्तांचे अभिनंदन केले. या वेळी त्यांच्यासमवेत समाधान बोडके, तुकाराम भोये, संस्थानचे अध्यक्ष नीलेश गाढवे, कांचन देशमुख, विश्वस्त आदी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Assembly Fight: महाराष्ट्र विधानसभा लॉबीमध्ये हाणामारी; आमदारांचे कार्यकर्ते भिडले, अटक आणि राजकीय आरोप-प्रत्यारोप

Tree Plantation : सदाहरित वृक्ष लागवडीसाठी ‘सह्याद्री संकल्प सोसायटी’चा पुढाकार

Vankranti : जाखोरीची विचारक्रांतीकडून ‘वनक्रांती’कडे वाटचाल

Warehouse Finance Receipt: गोदाम पावती वित्तपुरवठा विस्ताराची संधी

HTBT Cotton: धोरणफजिती आणि संकेताचा खेळ

SCROLL FOR NEXT