Sugarcane Crushing  Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Crushing : सहकारमहर्षी साखर कारखाण्याचे ९ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट

Sugarcane Crushing Season : राजेंद्र चौगुले ः साखर कारखान्याचा बॉयलर अग्नी प्रदीपन

Team Agrowon

Aakluj News : अकलूज : सहकारमहर्षी शंकरराव मोहिते- पाटील सहकारी साखर कारखान्याचा ६३ वा बॉयलर प्रदीपन समारंभ अध्यक्ष जयसिंह मोहिते- पाटील यांच्या हस्ते पार पडला. या समारंभानिमित्त संचालक रामचंद्र ठवरे व कुसुम ठवरे यांच्या हस्ते श्री सत्यनारायण महापूजा करण्यात आली. गत हंगामातील उसाकरिता ठरलेल्या धोरणाप्रमाणे अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली असून, कर्मचाऱ्यांना बोनस देण्यात आला आहे.

चालू हंगामात कारखान्याने नऊ लाख मे. टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवले असून, प्रतिदिन ८,५०० मे. टनापेक्षा जास्त ऊस गाळप करण्यासाठी यंत्रप्रणाली कार्यान्वित केली आहे. तसेच ऊस तोडणी व वाहतूक यंत्रणा ‘सहकारमहर्षी’चे ९ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट राजेंद्र चौगुले ः साखर कारखान्याचा बॉयलर अग्नी प्रदीपन भरलेली असून कारखान्याचे सर्व सभासद व बिगर सभासद यांनी नोंदीचा व बिगर नोंदीचा सर्व ऊस कारखान्यास देऊन सहकार्य करावे, असे आवाहन कार्यकारी संचालक राजेंद्र चौगुले यांनी केले.

यावेळी उपाध्यक्ष शंकरराव माने- देशमुख, संचालक लक्ष्मण शिंदे, नानासाहेब मुंडफणे, विजयकुमार पवार, रामचंद्र सिद, विराज निंबाळकर, रावसाहेब पराडे, भीमराव काळे, गोविंद पवार, तज्ज्ञ संचालक प्रकाशराव पाटील, रामचंद्रराव सावंत- पाटील, संचालिका सुजाता शिंदे, कार्यलक्षी संचालक रणजित रणनवरे आदी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Ethanol Rate : साखर, इथेनॉलच्या दरवाढीस अनुकूलता

Maharashtra Rain : तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता कायम

Sheep Farming : फिरस्त्या मेंढपाळीस हवे प्रोत्साहन

Rural Issues : रेवड्या नको, हवा रास्त भाव

Sugarcane Fire Issue : ऊस जळण्याच्या घटनांमुळे शेतकरी धास्तावले

SCROLL FOR NEXT