Poetry Award Agrowon
ॲग्रो विशेष

Poetry Award : लोककवी विठ्ठल वाघ साहित्य पुरस्कार सागर जाधव यांना जाहीर

Rural Poetry : निवड समितीमार्फत या पुरस्कारासाठी पुस्तकाची निवड केली जाते. कवी महाडीक यांच्या निवड समितीने या वर्षी या पुरस्काराची निवड केली.

Team Agrowon

Nashik News : कवी प्रा. संदीप जगताप व शिवव्याख्याते प्रा. जावेद शेख यांच्या वतीने दिला जाणारा उत्कृष्ट कवितासंग्रहासाठीचा लोककवी विठ्ठल वाघ राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार यावर्षी चांदवड (जि. नाशिक) येथील कवी सागर जाधव यांच्या ‘माती मागते पेनकिलर’ या कवितासंग्रहाला जाहीर झाला आहे. निवड समितीचे अध्यक्ष कवी लक्ष्मण महाडीक यांनी ही घोषणा केली.

शिरसगाव (ता. निफाड) येथील मॅग्नस फार्म येथे संपन्न झालेल्या या निवड समितीच्या बैठकीला मॅग्नस फार्मचे संचालक लक्ष्मण सावळकर, प्रा. जगताप, प्रा. शशिकांत घुटे उपस्थित होते. दरवर्षी महाराष्ट्रातल्या एका उत्कृष्ट कवितासंग्रहाला हा पुरस्कार दिला जातो. निवड समितीमार्फत या पुरस्कारासाठी पुस्तकाची निवड केली जाते.

कवी महाडीक यांच्या निवड समितीने या वर्षी या पुरस्काराची निवड केली. अकरा हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. महाराष्ट्रातून दीडशेपेक्षा जास्त कविता संग्रह यावेळी या पुरस्कारासाठी आले होते.

अंतिम फेरीमध्ये मोठी चुरस निर्माण झाली होती; परंतु नव्या काळाचे खेड्यातील प्रश्‍न घेऊन, नव्या प्रतिमा असलेली कविता ‘माती मागते पेनकिलर’ या कविता संग्रहात बघायला मिळते. तंत्रयंत्रकाळातील कविता या संग्रहात आली आहे.

शेतकऱ्यांपुढे उभे राहिले नवे प्रश्‍न या कवितेने सशक्त पणे मांडले आहे. म्हणून हा कविता संग्रह या पुरस्कारासाठी पात्र ठरला, असे निवड समितीने सांगितले. मान्यवरांच्या हस्ते लवकरच या पुरस्काराचे वितरण मॅग्नस फार्म येथे होणार आहे जाधव यांना पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल साहित्य क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver Second List: कर्जमाफीची दुसरी यादी प्रसिद्ध, ३ लाख ५५ हजार ६१४ पात्र शेतकऱ्यांचा समावेश

Agriculture Graduates Issues: कृषी पदवीधर, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर कृषिमंत्र्यांची भेट

Silk Farming: रेशीम शेतीतून शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्नाची संधी : डॉ. महेंद्र ढवळे

Shetkari Samruddhi Kisan Rail: ‘शेतकरी समृद्धी’ किसान रेल नावालाच!

Sugarcane Price Protest: ऊस दर जाहीर न करताच जॅगरी प्रकल्प सुरू, 'स्वाभिमानी'च्या कार्यकर्त्यांनी ऊस वाहतूक रोखली

SCROLL FOR NEXT