Maharashtra teachers constituency election results 2026: राज्यातील विधानपरिषदेच्या तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघातील मिळून पाच जागांसाठी आज (दि. २७ ऑक्टोबर) मतमोजणी सुरु आहे. छत्रपती संभाजीनगर, पुणे आणि नागपूर पदवीधर आणि अमरावती, पुणे शिक्षक मतदारसंघात २३ ऑक्टोबर रोजी मतदान पार पडले होते. पाच जागांसाठी एकूण १८२ उमेदवार रिंगणात आहेत. यामुळे कोण बाजी मारणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे..कोण कुठे आघाडीवर?सुरुवातीच्या कलानुसार, पुणे पदवीधरमध्ये भाजपच्या उमेदवार स्मिता जाधव आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या हर्षदा देशमुख- जाधव यांच्यात अटीतटीची लढत पाहायला मिळत आहे. तर पुणे शिक्षक मतदारसंघात पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये भाजपचे उमेदवार कौस्तुभ गावडे आघाडीवर आहे. काँग्रेसचे जयंत आसगावकर पिछाडीवर पडले आहेत. दुसऱ्या क्रमांकावर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा पाठिंबा असलेले सचिन सानप आणि अपक्ष उमेदवार दत्तात्रय सावंत यांच्यात अटीतटीची लढत सुरु आहे. .Maharashtra MLC Election Voting: तीन पदवीधर, दोन शिक्षक मतदारसंघांतील १८२ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद.छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश चव्हाण आघाडीवर आहेत. नागपूर पदवीधरमध्ये भाजपचे सुधाकर कोहळे आघाडीवर आहेत. तर काँग्रेसचे अभिजीत वंजारी पिछाडीवर आहेत. .Solapur DCC Bank Election: सोलापूर जिल्हा बँक निवडणुकीचा बिगूल अखेर वाजला; आठ वर्षांनंतर निवडणूक प्रक्रियेला सुरुवात.पहिल्या पसंतीची मते महत्त्वाची ठरणारपुणे पदवीधर मतदारसंघात ६२.७६ टक्के तर पुणे शिक्षकमध्ये ८५.८६ टक्के मतदानाची नोंद झाली होती. पुणे पदवीधर मतदारसंघातील मतमोजणीसाठी १०० टेबल आहेत. यासाठी ५ कक्षात प्रत्येकी १० टेबलच्या २ रांगा अशी व्यवस्था केली आहे. शिक्षक मतदारसंघातील मतमोजणीसाठी ४२ टेबल असून यासाठी ३ कक्षात प्रत्येकी ७ टेबलच्या २ रांगा आहेत. नागपूर पदवीधरमध्ये मतमोजणीसाठी ८४ टेबल आणि ३९ मतपेट्यांची व्यवस्था आहे. .या निवडणुकीत पहिल्या पसंतीची मते महत्त्वाची ठरतात. जे उमेदवार निर्धारित कोटा पूर्ण करतील ते विजयाच्या दिशेने वाटचाल करु शकतील. यामुळे या निवडणूक निकालाची उत्सुकता अधिक आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.