Monsoon Assembley Session Agrowon
ॲग्रो विशेष

Maharashtra Assembely Session: बोगस बियाण्यांवरून विधानसभेत राडा

Farmers Fraud: राज्यातील बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असून कृषी विभाग त्याकडे डोळेझाक करत आहे, असा आरोप करत सत्ताधारी आमदारांनी जोरदार आसूड ओढले.

बाळासाहेब पाटील

Mumbai News : राज्यातील बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असून कृषी विभाग त्याकडे डोळेझाक करत आहे, असा आरोप करत सत्ताधारी आमदारांनी जोरदार आसूड ओढले. कृिषमंत्र्यांची अनुपस्थिती, तर कृषिराज्यमंत्री आशिष जैस्वाल यांनी लावून धरलेली अधिकाऱ्यांची बाजू आणि आक्रमक सत्ताधारी आमदार यामुळे बोगस बियाण्यांसंदर्भातची लक्षवेधी अखेर राखून ठेवण्याची नामुष्की सरकारवर आली.

मागील बाकावरील भाजपच्या आमदारांनी शिंदे गटाच्या कृषी राज्यमंत्री जैस्वाल यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव श्री. जैस्वाल यांच्या मदतीला धावले. वारंवार मागणी करूनही बोगस बियाण्यांच्या वितरणास जबाबदार असलेल्या अधिकाऱ्याला तातडीने निलंबित करा, अशी मागणी सत्ताधारी आमदारांनी लावून धरली. काही अधिकाऱ्यांची नावे जाहीर करूनही श्री. जैस्वाल यांनी चौकशीअंती कारवाई करू, असे पालुपद लावल्याने आमदारांनी कृषी विभागाचे वाभाडे काढले.

राजेश बकाने यांनी वर्धा जिल्ह्यातील वरुण सीड्स या हैदराबादच्या कंपनीने बोगस बियाणे वितरित केल्याबाबत लक्षवेधी मांडली. या माध्यमातून भाजपच्या आमदारांनी श्री. जैस्वाल यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला. हरीश पिंपळे, रणधीर सावरकर, भास्कर जाधव, समीर कुणावार, हेमंत उगले, चरणसिंग ठाकूर यांच्यासह सर्वच आमदारांनी कृषी विभाग हाच बोगस बियाण्यांना कारणीभूत असल्याचे सांगून जेथे-जेथे तक्रारी झाल्या आहेत, तेथील अधिकाऱ्यांना निलंबित करावे, अशी मागणी केली.

एकाकी पडलेल्या श्री. जैस्वाल यांच्या मदतीला भाजपचे संजय कुटे धावून आले. त्यांनी ही लक्षवेधी सूचना राखून ठेवावी, सोमवारी बैठक घेऊन मंगळवारी सभागृहाला याची माहिती द्यावी, अशी सूचना केली. मात्र सदस्य आक्रमक होते. त्यांनी अधिकाऱ्यांवरील कारवाईचा मुद्दा लावून धरला. जैस्वाल यांनीही तक्रार आली, तर कारवाई करू असे सांगितल्याने भास्कर जाधव यांनी सरकारची काही जबाबदारी नाही का, अशा शब्दांत सुनावले.

तालिका अध्यक्ष अभिजित पाटील यांनीही निर्णय घेण्याबाबत सूचना केली. तसेच वर्ध्यातील वरुण सीड्स ही कंपनी साथी पोर्टलवर आहे की नाही ते सांगा. जर साथी पोर्टलवर नोंदणी अनिवार्य असेल तरीही बोगस बियाणे येत असतील तर अधिकाऱ्यांची चौकशी का केली नाही. जर अधिकाऱ्याचे नाव घेऊन कारवाईची मागणी होत असेल तर सदस्यांची भावना समजून घेतली पाहिजे, अशी सूचना पाटील यांनी केली. पिंपळे यांनी अधिकाऱ्यांना निलंबित करता येत नसेल तर चौकशी होईपर्यंत त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याची मागणी केली. बकाने यांनी वर्धाच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तोटावार यांना निलंबित करावे, अशी मागणी केली.

संजय कुटे धावले मदतीला

श्री. जैस्वाल यांची कोंडी केल्यानंतर भाजपचे संजय कुटे मदतीला धावून आले. सर्वच प्रश्नांची उत्तरे मिळणे अशक्य असल्याचे सांगून इतक्या कमी वेळात बियाणे कंपन्यांची चौकशी करणे शक्य नाही. जे अधिकारी दोषी आहेत त्यांची नावानिशी माहिती मंत्र्यांसोबतच्या बैठकीत सोमवारी द्या. जे-जे अधिकारी दोषी असतील त्यांना तातडीने निलंबित करावे, अशी सूचना केली. तरीही सदस्य आक्रमक राहिले. अखेर गोंधळ वाढल्यानंतर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे सभागृहात आल्यानंतर त्यांनी ही लक्षवेधी राखून ठेवण्याची विनंती केली. ती अध्यक्षांनी मान्य केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Deforestation In India : इंग्रज, वन विभाग आणि जंगलांचा ऱ्हास

Healthy Tiffin: व्यस्त दिनचर्येतही आरोग्यदायी टिफिनचा सोपा पर्याय

Namo Drone Didi Scheme : नमो ड्रोन दीदी योजनेतून महाराष्ट्रातील ४७ गटांना अनुदान

Corporate Finance Capitalisms : सत्ताधारी वर्गाचे राजकीय अर्थकारण

Monsoon Crisis Maharashtra : पूर : असमन्वय अनियंत्रणाचा!

SCROLL FOR NEXT