Crop Insurance  Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance Payout: पीकविम्याचे शेतकऱ्यांच्या खात्यात ३४३८ कोटी रुपये जमा

Kharif 2024 Compensation: राज्यातील शेतकऱ्यांना खरिप हंगाम २०२४ मधील पीक नुकसानीपोटी एकूण ३ हजार ८४७ कोटी रुपयांची विमा भरपाई मंजूर झाली आहे. त्यापैकी शेतकऱ्यांच्या खात्यात आतापर्यंत ३ हजार ४३८ कोटी रुपये जमा करण्यात आले.

Anil Jadhao 

Pune News: राज्यातील शेतकऱ्यांना खरिप हंगाम २०२४ मधील पीक नुकसानीपोटी एकूण ३ हजार ८४७ कोटी रुपयांची विमा भरपाई मंजूर झाली आहे. त्यापैकी शेतकऱ्यांच्या खात्यात आतापर्यंत ३ हजार ४३८ कोटी रुपये जमा करण्यात आले. राज्य सरकारने आपला दुसरा हप्ता दिल्यानंतर शेतकऱ्यांना काढणी पश्चात नुकसान आणि पीक कापणी प्रयोग आधारित भरपाई मिळणार आहे.

शेतकऱ्यांना खरिप हंगाम २०२४ मध्ये एकूण ४ ट्रीगरमधून विमा भरपाई मंजूर झाली. स्थानिक नैसर्गिक आपत्ती, हंगामातील प्रतिकूल परिस्थिती, काढणी पश्चात नुकसान आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित भारपाई शेतकऱ्यांना मिळत आहे. राज्याने आपला पहिला हप्ता दिल्यानंतर शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती, हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन ट्रिगरमधून भरपाई मिळत आहे.

खरिप हंगामात नुकसान झालेल्या ८० लाख ५४ हजार शेतकऱ्यांना पीक विमा भरपाई मंजूर झाली आहे. या शेतकऱ्यांना ३ हजार ८४७ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. त्यापैकी ७३ कोटी ५३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ३ हजार ४३८ कोटी रुपये जमा झाले. स्थानिक नैसर्गिक आपत्ती या ट्रीगरमधून ५६ लाख ५२ हजार शेतकऱ्यांना २ हजार ८४० कोटी रुपये विमा भरपाई मंजूर झाली. त्यापैकी ५६ लाख १३ हजार शेतकऱ्यांना २ हजार ६८४ कोटी रुपये विमा भरपाई देण्यात आली. तर हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या ट्रीगरमधून १९ लाख ३८ हजार शेतकऱ्यांना ७१२ कोटी रुपयांची विमा भरपाई मंजूर करण्यात आली. त्यापैकी १८ लाख ९२ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात ७०७ कोटी रुपये जमा करण्यात आले.

काढणी पश्चात नुकसान भरपाई २ लाख ८८ शेतकऱ्यांना मंजूर झाली असून २७७ कोटी रुपये मिळणार आहेत. त्यापैकी २१ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात ३९ कोटी रुपये जमा करण्यात आले. पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाई १ लाख ७४ हजार शेतकऱ्यांना मंजूर झाली. या शेतकऱ्यांच्या खात्यात ७ कोटी रुपये जमा करण्यात आले.

विमा भरपाईची स्थिती

शेतकऱ्यांना आतापर्यंत स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन ट्रीगरमधून ३ हजार ३९१ कोटी रुपये मिळाले. अजून १६१ कोटी रुपये मिळणार आहेत. मात्र, काढणी पश्चात नुकसान आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाई राज्याने आपला १०१५ कोटी रुपयांचा दुसरा हप्ता दिल्यानंतर मिळणार आहेत. राज्याने हप्ता दिल्यानंतर २४८ कोटी रुपयांची भरपाई शेतकऱ्यांना मिळेल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rain Crop Damage : पावसाने ७४४ गावांमधील सोळा हजार शेतकऱ्यांचे नुकसान

Bhumi Abhilekh Portal : पोर्टलवर ८३ गावांचे दर्शन दुर्लभ

MGNREGA Fund : ‘मनरेगा’च्या अंमलबजावणीत निधी उपलब्धतेचा अडसर

Fertilizer Buffer Stock : ‘बफर स्टॉक’मधून १३०२ टन युरिया खुला

Health Workers Issue : आरोग्य कर्मचाऱ्यांची आर्थिक घडी कोलमडली

SCROLL FOR NEXT