Temghar Dam Agrowon
ॲग्रो विशेष

Temghar Dam: टेमघर धरणाच्या दुरुस्तीसाठी ३१५ कोटी रुपये मान्यता

Dam Repair Amount Sanctioned: शहराला पाणीपुरवठा करणाऱ्यांपैकी एक असलेले टेमघर धरण दुरुस्तीचे काम मागील साडेतीन वर्षांपासून अर्धवट स्थितीत आहे. शासनाकडून दुरुस्तीच्या सुधारित प्रस्तावाला मान्यता न मिळाल्याने धरण दुरुस्तीचे काम सुरू होऊ शकले नाही.

संदीप नवले : अॅग्रोवन वृत्तसेवा

Pune News: शहराला पाणीपुरवठा करणाऱ्यांपैकी एक असलेले टेमघर धरण दुरुस्तीचे काम मागील साडेतीन वर्षांपासून अर्धवट स्थितीत आहे. शासनाकडून दुरुस्तीच्या सुधारित प्रस्तावाला मान्यता न मिळाल्याने धरण दुरुस्तीचे काम सुरू होऊ शकले नाही. अखेर मंगळवारी शासनाने मंत्रिमंडळाच्या बैठकीत टेमघर धरणाच्या मजबुतीकरण व गळती रोखण्याच्या कामांकरिता ३१५ कोटी रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता दिली आहे. शासनाच्या या निर्णयामुळे टेमघर धरणाच्या दुरुस्तीचे काम सुरू होणार आहे.

टेमघर धरणाची क्षमता सुमारे ३.७१ टीएमसी इतकी आहे. पुणे शहराला दरवर्षी ३.४० टीएमसी इतके पाणी पिण्यासाठी उपलब्ध केले जाते, तसेच मुळशी तालुक्यातील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याद्वारे १ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. या प्रकल्पाला गळती लागल्यामुळे पाण्याचा अपव्यय होतो,

यामुळे धरण तसेच पुणे शहराच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो, तसा अहवाल विविध समित्यांनी दिला आहे. त्यांच्या शिफारशींचा विचार करता धरणाची गळती रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. हे काम केल्याने गळती थांबणार असून त्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठीही पाणी उपलब्ध होणार आहे. या सर्व बाबींचा एकत्रित विचार करता या निधीला राज्य शासनाने मंजुरी दिली आहे.

टेमघर धरणाचे काम सन २०१० साली पूर्ण झाले आणि तेव्हापासून धरणात पाणी साठविण्यास सुरुवात करण्यात आली. धरणातून मोठ्या प्रमाणावर गळती सुरू झाली, यानंतर धरण दुरुस्तीचा निर्णय घेण्यात आला. पाणीसाठा असताना दुरुस्ती शक्य नसल्याने पाणी खडकवासला धरणात सोडण्यात येत होते. त्यानंतरच दुरुस्ती करण्यात येत होती. गळती प्रतिबंधक कामे सन २०१७ मध्ये हाती घेण्यात आली. या कामांमध्ये पहिल्या आणि

दुसऱ्या टप्प्यात ड्रिलिंग, ग्राऊटिंग या पद्धतीने धरण दुरुस्तीचे काम करण्यात आले. धरण दुरुस्तीचे हे दोन्ही टप्पे पूर्ण झाले आहेत. तिसऱ्या टप्प्यात धरणाच्या आतील बाजूस सिमेंटच्या आच्छादीकरणाचे काम अर्धवट राहिले आहे. कोरोनाची दोन वर्षे आणि त्यानंतर निधी न मिळाल्याने हे काम पूर्ण होऊ शकले नाही. टेमघर धरणाची उंची ८६ मीटर, तर लांबी १०७५ मीटर आहे. या भागात सिमेंट आच्छादीकरण केले जाणार आहे. आतापर्यंत ७० टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित ३० टक्के बाकी आहे, असे जलसंपदा विभागाने सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Biological Crop Disease Management: जैविक पद्धतीने भुरी नियंत्रण यशस्वी करण्याच्या उपाययोजना

Organic Farming Success Story: सेंद्रिय, स्वावलंबी शेती पध्दतीचे साकारले मॉडेल

Artificial Intelligence: ‘एआय’ उडविणार झोप ...

India UK Trade Deal: व्यापार कराराचे फलित

Waste Management: कचऱ्याच्या ढिगाखाली गाडलेली व्यवस्था

SCROLL FOR NEXT