Ashadhi Wari Agrowon
ॲग्रो विशेष

Ashadhi Wari 2025 : आषाढीसाठी नगर जिल्ह्याला दोन कोटी ६१ लाखांचा निधी

Palakhi Sohala 2025 : आषाढी यात्रेसाठी अहिल्यानगर जिल्ह्यातून मार्गस्थ होणाऱ्या पालख्यांसोबत असलेल्या वारकऱ्यांच्या विविध सुविधांसाठी राज्य सरकारने जिल्ह्यासाठी २ कोटी ६१ लाख ८० हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

Team Agrowon

Ahilyanagar News : आषाढी यात्रेसाठी अहिल्यानगर जिल्ह्यातून मार्गस्थ होणाऱ्या पालख्यांसोबत असलेल्या वारकऱ्यांच्या विविध सुविधांसाठी राज्य सरकारने जिल्ह्यासाठी २ कोटी ६१ लाख ८० हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून हा निधी उपलब्ध होणार असून, यातून वॉटरप्रूफ मंडप, शौचालये, स्नानगृहे, पिण्याचे पाणी, वैद्यकीय सुविधा व ग्रामपंचायत साहाय्य अनुदान यांचा समावेश असेल.

अहिल्यानगर जिल्ह्यातून दर वर्षी पैठण येथील संत एकनाथ महाराज, त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तिनाथ महाराज, पिंपळनेर येथील संत निळोबाराय महाराज यांच्या प्रमुख पालख्यांसह सुमारे १६० स्थानिक पालख्या पंढरपूरकडे मार्गस्थ होतात.

या यात्रेत महिला व पुरुष वारकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती असते. त्यांच्या प्रवासादरम्यान कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी मागील दोन वर्षांपासून जिल्हा प्रशासनाकडून नियोजन केले जात आहे. पालख्यांचा अहिल्यानगर जिल्ह्यात मुक्काम असतो.

याकाळात वारकऱ्यांना त्रास होऊन नये म्हणून पावसाळ्यातील मुक्कामांदरम्यान वॉटरप्रूफ मंडपांची गरज, रस्त्यांची दुरवस्था, स्वच्छतागृहे, वैद्यकीय सुविधा व पिण्याच्या पाण्याच्या अडचणी वारकऱ्यांनी अधोरेखित केल्या. यावर तातडीने उपाययोजना करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी दोन कोटी १६ लाख ८० हजाराचा निधी मंजूर झाला असून त्याबाबतचे प्रस्ताव राज्य शासनाकडे दिले आहेत.

अहिल्यानगरला जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पालखी नियोजन बैठक झाली. वरिष्ठ अधिकारी, प्रमुख देवस्थानांचे प्रतिनिधी, दिंड्यांचे प्रमुख उपस्थित होते. पालखी मार्गावरील अडचणी जाणून घेत प्रशासनाने सर्व सुविधा वेळेत पुरवण्याचे आश्वासन दिले.

यासाठी विविध विभागांचे अधिकारी समन्वयक म्हणून काम करणार आहेत. अहिल्यानगर जिल्ह्याने सुरू केलेला हा पॅटर्न संपूर्ण राज्यात आदर्श मानला जात असून, सोलापूर जिल्ह्यातही याच धर्तीवर नियोजन सुरू झाले आहे. मंजूर निधीतून सर्व पालखी मार्गांवर सुविधा पुरवण्यासाठी तातडीने कार्यवाहीचे आदेशही पालकमंत्र्यांनी प्रशासनास दिले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Environmental Management: इरिओफाइड कोळीचे पर्यावरणपूरक व्यवस्थापन

Agarbatti Business: अगरबत्ती उद्योगात तयार केला ब्रॅण्ड

Mission Jalbandhu: रोजगार, जलसुरक्षितेसाठी ‘मिशन जलबंधू’

Weekly Weather: उघडिपीसह हलक्या पावसाची शक्यता

Mango Farming: वीस वर्षे जुन्या आंबा बागेचे होणार नूतनीकरण

SCROLL FOR NEXT