Sugar Mill Agrowon
ॲग्रो विशेष

Sugar Mill Issue : मकाई, सहकारशिरोमणी, विठ्ठल रिफाइंडवर ‘आरआरसी’ कारवाई

Team Agrowon

Solapur Sugar Mill News : सोलापूर जिल्ह्यात २०२२-२३ या गळीत हंगामात गाळप केलेल्या उसापोटी शेतकऱ्यांना अद्यापही एफआरपीप्रमाणे ऊस बिले न दिलेल्या जिल्ह्यातील तीन साखर कारखान्यावर आरआरसी अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

सुमारे १५४ कोटी रुपयांची बिले या कारखान्यांकडून शेतकऱ्यांना देणे बाकी आहे. विशेष म्हणजे मकाई आणि सहकारशिरोमणी या दोन्ही कारखान्यांच्या संचालक मंडळाची सध्या निवडणूक प्रक्रिया सुरु आहे.

या प्रक्रियेतच साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी या दोन्ही कारखान्यावर कारवाईचा बडगा उचलला आहे. भिलारवाडी (ता.करमाळा) येथील मकाई सहकारी साखर कारखाना, भाळवणी (ता.पंढरपूर) येथील सहकारशिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना आणि पांडे (ता.करमाळा) येथील विठ्ठल रिफाउंड शुगर या तीन कारखान्यांचा समावेश यामध्ये आहे.

विठ्ठल रिफाइंड शुगरकडे ८३ कोटी ७ लाख २१ हजार रुपये, सहकार शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखान्याकडे ४४ कोटी २४ लाख ९८ हजार रुपये आणि मकाई साखर कारखान्याकडे २६ कोटी ३२ लाख १८ हजार रुपयांची एफआरपी थकीत आहे.

आरआरसी कारवाईनुसार या तीनही कारखान्यांनी उत्पादित केलेली साखर, मोलॅसिस व बगॅसची विक्री करून शेतकऱ्यांना १५ टक्के व्याजदराने एफआरपीची ही रक्कम द्यावी, असा आदेशही साखर आयुक्त गायकवाड यांनी दिला आहे.

शेतकरी संघटना आक्रमक

थकीत एफआरपीच्या या मुद्द्यावरून गेल्या काही दिवसांपासून सातत्याने कारखानदार आणि शेतकरी संघटना यांच्यामध्ये संघर्ष सुरु आहे. सध्या मकाई आणि सहकारशिरोमणी या कारखान्याच्या निवडणूका जाहीर झाल्या आहेत.

विशेष म्हणजे शेतकऱ्यांच्या रकमा थकीत ठेवून सत्ताधारी पुन्हा निवडणूक रिंगणात उतरले आहेत, यावरूनही मोठा संताप व्यक्त होत आहे. आता अलीकडेच दूधदराच्या प्रश्नावर रास्ता-रोको आंदोलनात संघटनांनी आक्रमक भूमिका घेत, ऊसबिलाचा मुद्दाही ताणून धरल्याचे दिसते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Crop : वाढलेल्या सोयबीनमध्ये शेंगांचा शोध

Agricos Welfare Society : ‘कृषी’च्या विद्यार्थ्यांकडून सेवाभावी संस्थेला मदत

E-Peek Pahani : छप्पन टक्के शेतकऱ्यांनी नोंदविली ई-पीकपाहणी

Crop Damage Compensation : नांदेडमधील शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई

Integrated Agriculture : एकात्मिक शेती पद्धतीच्या यशस्वी मॉडेलचा प्रसार व्हावा

SCROLL FOR NEXT