Rotary Projects Agrowon
ॲग्रो विशेष

Tribal Development : रोटरीकडून आदिवासी भागात कृषी पर्यटनाला चालना

Agriculture Tourism : कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठी रोटरी क्लब ऑफ नाशिकतर्फे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. त्याचाच भाग म्हणून सभासदांसाठी दिंडोरी तालुक्यातील वारे शिवारातील टिटवे या आदिवासीबहुल गावात ‘कृषी मंथन’ कार्यक्रमांतर्गत शिवार फेरीचे आयोजन करण्यात आले होते.

Team Agrowon

Nashik News : कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठी रोटरी क्लब ऑफ नाशिकतर्फे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. त्याचाच भाग म्हणून सभासदांसाठी दिंडोरी तालुक्यातील वारे शिवारातील टिटवे या आदिवासीबहुल गावात ‘कृषी मंथन’ कार्यक्रमांतर्गत शिवार फेरीचे आयोजन करण्यात आले होते. या माध्यमातून आदिवासी भागात कृषी पर्यटनाला चालना मिळत आहे.

रोटरी क्लब ऑफ नाशिक सभासदांसाठी विविध उपक्रम घेत असते. त्याअंतर्गत हा कार्यक्रम घेण्यात आला. टिटवे गाव स्ट्रॉबेरी शेतीसाठी प्रसिद्ध असून, गावातील शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांपेक्षा स्ट्रॉबेरीकडे लक्ष केंद्रित करून आपले आर्थिक उत्पन्न वाढविले आहे.

रोटरी क्लब सभासद व कुटुंबीयांनी स्ट्रॉबेरी तोडून खाण्याची मजा या वेळी लुटली. सभोवतालच्या परिसरात ट्रॅक्टरने भटकंती करून आदिवासी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांचे लोकजीवन अभ्यासले.

याप्रसंगी कृषितज्ज्ञ डॉ. रामनाथ जगताप, विभागीय कृषी अधिकारी योगेश खैरनार व श्यामकांत पाटील यांनी शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरी शेतीची माहिती व उत्पादन तंत्रज्ञानाविषयी मार्गदर्शन केले.

स्ट्रॉबेरी सुरत व अहमदाबाद येथे विक्रीसाठी पाठवली जाते. या परिसरातील बहुसंख्य शेतकरी याकृषिमंथन कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT