Rohit Pawar Agrowon
ॲग्रो विशेष

Rohit Pawar : रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ; आज ईडीची चौकशी; शरद पवार गटाचे जारदार शक्तीप्रदर्शन

Rohit Pawar ED Enquiry : रोहित पवार यांना ईडीने चौकशीसाठी बोलवले असून ते चौकशीला सामोरे जाणार आहेत. यावेळी खासदार सुप्रिया सुळे त्यांच्यासोबत आहेत. तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कार्यालयाजवळ मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : राज्यात गेल्या काही दिवसांपासून अंमलबजावणी संचालनालयाकडून (ED) छापेमारी आणि चौकशी केली जात आहे. विशेषत: महाविकास आघाडीतील नेत्यांवर छापेमारी आणि चौकशीचा ससेमिरा लागला आहे. याच्याआधी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी, आमदार रवींग्र वायकर आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर ईडीने फास आवळला आहे. त्यापाठोपाठ आता ईडीने आपला मोर्चा शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्याकडे वळवला आहे. रोहित पवार यांना ईडीने समन्स बजावत बुधवारी चौकशीला हजर राहण्याचे निर्देश दिले होते.

त्याप्रमाणे रोहित पवार हे चौकशीला सामोरे जाणार आहेत. मात्र याच्याआधी मुंबईत त्यांना पाठिंबा देण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते आणि शरद पवार गटाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात मुंबईत दाखल झाले आहेत. महाराष्ट्र शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रोवर ईडीने आठवड्यांपूर्वीच छापेमारी केली होती. तसेच रोहित पवार यांना २४ जानेवारीला ईडीने समन्स बजावला होता.

दरम्यान चौकशीला सामोरे जाण्याच्या आधी रोहित पवार म्हणाले, मी राज्य सरकारच्या बाबतीत प्रश्न उपस्थित केले होते. त्यामुळे माझ्यावर दबाव आणण्यासाठी ही चौकशी केली जातेय. केंद्रीय यंत्रणांचा वापर करून माझ्यावर दबाब आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. माझी केस अत्यंत साधी आणि सोपी आहे. ईडीने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे आणि त्यांनी मागितलेली कागदपत्रे याच्याआधीच मी दिली आहेत.

यानंतरही माझ्यावर दबाव आणण्यासाठी आता पुन्हा चौकशीला बोलावले जात आहे. मी तपास यंत्रानांना सहकार्य करणार आहे. ‘मराठी माणूस नेहमी लढतो, तो कधीही पळून जात नाही, त्यामुळे मी चौकशीला समोर जाईन. पळ काढणार नाही. तर ताठ मानेने चौकशीला सामोरे जाणार’, असेही ते म्हणाले.

शरद पवार आणि सुप्रिया सुळे

रोहित पवार यांची आज ईडी चौकशी होणार असून ते ईडीच्या कार्यालयात हजर होणार आहेत. त्यामुळे येथे कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी करत नारेबाजी केली आहे. तर खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांना ईडी कार्यालयापर्यंत सोडायला गेल्या होत्या. तसेच या चौकशीवरून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे देखील दिवसभर पक्षाच्या कार्यालयातच थांबणार आहेत.

चौकशी कशा बद्दल?

ईडीने आठवड्यांपूर्वीच बारमती अॅग्रो कथित गैरव्यावहार प्रकरणी मुंबईसह सहा ठिकाणी छापेमारी केली होती. बारामती अॅग्रोवर महाराष्ट्र शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी छापेमारी करण्यात आली होती. तर बारमती अॅग्रो कंपनीची मालकी ही आमदार रोहित पवार यांच्याकडे असल्याने ईडीने रोहित पवारांना नोटीस बजावली होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT