Water Shortage Agrowon
ॲग्रो विशेष

Agrani River : कवठेमहांकाळ तालुक्यातील नदी, विहिरी, कूपनलिका पडल्या कोरड्या

अग्रणी नदी निरंतर प्रवाहित झाल्यास शेतकरी पारंपरिक शेतीव्यवसायात बदल करून तो फळशेती, फूलशेतीबरोबर भाजीपाल्याचा शेतीव्यवसाय ‘हायटेक’ बनवत आर्थिक स्थैर्य प्राप्त होईल.

Team Agrowon

Sngali News : म्हैसाळ सिंचन योजनेतून (Mhaisal Irrigation Scheme) पाणी तुडुंब वाहत असूनही कवठेमहांकाळ तालुक्याची असलेली अग्रणी नदी कोरडी ठणठणीत पडली आहे. या योजनेची स्थिती अडचण नसून खोळंबा होऊन बसल्यानेच अग्रणी नदीकाठावरील पिके अखेर वाळू लागली आहेत.

अग्रणी नदी खोऱ्या‍तील तब्बल २१ गावे असून खानापूर तालुक्यातील ८ गावे असून तासगाव तालुक्यातील ६ गावे आहेत.

तालुक्यातील ७ गावे असून या गावांच्या गावकुसातील अग्रणी नदी कित्येक दिवसांपासून ठणठणीत असल्याने नदीखोऱ्यातील या २१ गावांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर असल्याने म्हैसाळ व टेंभू या दोन योजना असून ही शेतकऱ्यांची अशी स्थिती होऊन बसली आहे.

म्हैसाळ व टेंभू योजनेतून अग्रणी नदीत पाणी सोडून बारमाही केल्यास अग्रणी खोऱ्यातील शेतकऱ्यांच्या पिण्याबरोबर शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटेल व दोन हजार हेक्टर शेती ओलिताखाली येईल आणि कवठेमहांकाळ तालुक्याचा दुष्काळी कंलक कायमचाच पुसला जाईल.

दोन हजार हेक्टर ओलिताखाली

अग्रणी बारमाही झाल्यास खोऱ्‍यातील खानापूर, तासगाव, कवठेमहांकाळ या तीन तालुक्यांतील तब्बल २१ गावे अग्रणी नदी काठावरील असून त्यामध्ये खानापूर तालुक्यातील ८ गावे तामखडी, ऐनवाडी, गोरेवाडी, बलवडी (खा.), बेणापूर, सुलतानगादे, खापरगादे, करंजे.

तासगाव तालुक्यातील ६ गावे वायफळे, बिरणवाडी, सिद्धेवाडी, सावळज, वज्रचौंडे, गव्हाण आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील ७ गावे मळणगाव, शिरढोण, मोरगाव, विठूरायाची वाडी, हिंगणगाव, अग्रण धुळगाव, लोणारवाडी ही गावे असून तीन तालुक्यातील अग्रणी खोऱ्यात एकूण २१ गावातील दोन हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार, हे निश्चित.

‘अग्रणी नदीत पाणी सोडावे’

अग्रणी नदी निरंतर प्रवाहित झाल्यास शेतकरी पारंपरिक शेतीव्यवसायात बदल करून तो फळशेती, फूलशेतीबरोबर भाजीपाल्याचा शेतीव्यवसाय ‘हायटेक’ बनवत आर्थिक स्थैर्य प्राप्त होईल.

कवठेमहांकाळ तालुक्यात पिण्याबरोबर शेतीच्या पाण्याचा प्रश्न कायमचाच मिटेल आणि कवठेमहांकाळ तालुक्यावरील असलेला दुष्काळी कंलक कायमचाच पुसला जाईल, यासाठी म्हैसाळ योजनेचे पाणी सोडून अग्रणी नदीत पाणी सोडावे व तलावे भरून घ्यावीत, अशी शेतकरी वर्गातून मागणी होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rabi Sowing: धुळे जिल्ह्यात २३ टक्क्यांवर रब्बी पेरणी

Agricultural Import Policy: आयात धोरण शेतकरी, ग्राहकांच्या हिताच्या दृष्टीने समतोल हवे- कृषिमंत्री चौहान

Rabi Crop Competition: रब्बी हंगाम स्पर्धेसाठी अर्ज करा

Micro Irrigation: पिकांसाठी सूक्ष्मसिंचन पद्धतीचा वापर

Farmer Relief: नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ३५० कोटींची मदत

SCROLL FOR NEXT