Sugarcane Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Yield : उसात पावसाचे पाणी साचल्याने उत्पन्नघटीचा धोका

Sugarcane Growth Issue : माळ भागातील शेती वगळता अन्य भागात सततच्या पावसामुळे ऊस शेतीत पावसाचे पाणी साचल्याने उसाची वाढ खुंटली आहे.

Team Agrowon

Kolhapur News : माळ भागातील शेती वगळता अन्य भागात सततच्या पावसामुळे ऊस शेतीत पावसाचे पाणी साचल्याने उसाची वाढ खुंटली आहे. उसाला अन्नद्रव्य मिळवून देणाऱ्या पांढऱ्या मुळांची वाढ थांबल्याने परिणामी उसाच्या वाढीवरही परिणाम झाला आहे.

पाणी साचून राहिलेल्या उसाचे वजन घटण्याचा धोका निर्माण झाला आहे. विशेष करून शिरोळ, हातकणंगले तालुक्यांत सातत्याने पाऊस होत असल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यात पूर येऊन गेल्यानंतर केवळ दहा ते बारा दिवस पावसाची उघडीप राहिली. यानंतर पुन्हा पावसास सुरुवात झाली. अनेक ठिकाणी वाफसा येण्याआधीच पुन्हा शेतामध्ये पाण्याचे तळे झाले.

गेल्या दोन-तीन वर्षांच्या तुलनेत या वर्षी हंगामात चांगला पाऊस झाला. परिणामी, गेल्या दीड महिन्यापासून ऊस शेतीत सरीच्या सरी भरून पाणी तुंबून राहिले आहे. पावसाचे प्रमाण कमी झाले तरी जमिनीतून पाण्याचा उमाळा सुरूच आहे.

गेल्या दीड महिन्यापासून उसाच्या शेतीत पाणी जसेच्या तसे राहिल्याने काही ठिकाणी शेती अक्षरशः शेवाळली आहे. सध्या जिल्ह्यात एक दोन तासांनी जोरदार सरी पडत असल्याने पाण्याचे निचरा अत्यंत कमी प्रमाणात होत आहे. माळ रानावरील उसासाठी मात्र हा पाऊस दिलासादायक असल्याचे चित्र आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Revenue Department Corruption: सावधान, लाचखोरी फोफावतेय

Trimbakeshwar Pilgrimage: संतश्रेष्ठ निवृत्तिनाथांच्या त्र्यंबकनगरीत भाविकांची अलोट गर्दी

Yarn Production: महिला बचत गट करणार रंगीत कापसापासून सूत निर्मिती

Fig Farming: कष्टांना त्यांच्या सीमा नाहीत

Chana Varieties: ‘महाबीज’ संशोधित हरभऱ्याच्या नव्या वाणांची अधिकृत नोंदणी

SCROLL FOR NEXT