Farmer Snake Bite agrowon
ॲग्रो विशेष

Snake Bite : चांदवड तालुक्यात सर्पदंशाचा वाढता धोका

Death Due To Snake Bite : चांदवड तालुक्यात तीन वर्षांत तब्बल ५०३ सर्पदंशाच्या घटना घडल्या, त्यात ३ नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

Team Agrowon

Nashik News : चांदवड तालुक्यात तीन वर्षांत तब्बल ५०३ सर्पदंशाच्या घटना घडल्या, त्यात ३ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. मात्र, अनेक नागरिक योग्य उपचार न मिळाल्याने आजही अपंगत्वाच्या उंबरठ्यावर आहेत. विशेषतः डोंगर परिसरालगतच्या गावांमध्ये सर्पदंशाच्या घटनांचे प्रमाण अधिक आहे.

चांदवड तालुक्यात इंडियन कोब्रा (नाग) मण्यार, घोणस, फुरसे हे विषारी साप आढळतात. तसेच, धामण, कवड्या, तस्कर, मांडूळ, डुरक्या घोणस, धूळनागीण, नानेटी, विरुळे, गवत्या, कुकरी यांसारख्या बिनविषारी सापांचाही परिसरात मोठा वावर आहे.

दुर्दैवाने, सर्पदंशामुळे मानवी जीवितासोबतच मोठ्या प्रमाणात जनावरांचाही मृत्यू होत आहे. सर्पदंशानंतर अनेक ठिकाणी झाडफुंकर, गंडे-दोरे, मंत्र-तंत्र, मिरच्या खायला देणे, झाडू मारणे असे अवैज्ञानिक उपाय केले जातात.

अशा अंधश्रद्धांमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मागील वर्षी एका लहान मुलाचा मांत्रिकाच्या उपचारांमुळे मृत्यू झाला, तरीही कोणीही आवाज उठवला नाही. काही प्रकरणांमध्ये रुग्णास वेळीच रुग्णालयात आणले गेले, मात्र तत्पूर्वी घरीच केलेल्या चुकीच्या उपचारांमुळे प्राण गमवावे लागले.

जनजागृती आणि शासनाची भूमिका महत्त्वाची

चांदवडला २०२२ ते २४ या तीन वर्षांत उपजिल्हा रुग्णालयात ५०३ जणांवर उपचार झाले. मात्र काही जणांचा हॉस्पिटलमध्ये पोहोचण्याआधीच मृत्यू झाला, तर अनेक जणांना इतर हॉस्पिटल मध्ये संदर्भित केल्यानंतर मृत्यू झाल्याने अधिकृत नोंदच नाही. काहींना सर्पदंशामुळे गँगरीन झाल्याने आयुष्यभर अपंगत्व आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

US Tariff Attack : अमेरिकेच्या व्यापार हल्ल्याला उत्तर काय?

Women In Farming : कोरडवाहू शेतीत महिलांचे स्थान काय?

Manoj Jarange Patil: मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांचे उपोषण चौथ्या दिवशी कायम; मुख्यमंत्र्यांचे प्रत्युत्तर

Cotton Farming Tips : कापसाची उत्पादकता वाढण्याचा प्राथमिक अंदाज

Indian Economy : कोट्यवधी नागरिकांचे उत्पन्न कसे वाढेल?

SCROLL FOR NEXT