Aslam Abdul Shanedivan
सध्या पावसाचे दिवस सुरू असून अनेक ठिकाणी सर्पदंश झाल्याची घटना समोर येते. मात्र साप विषारी होता किंवा बिन विषारी याच्याच चिंतेने माणूस आर्धा होतो.
भारतामध्ये ३०० सापांच्या जाती असून यापैकी ५० जाती या विषारी आहेत. तर ५० पैकी चार जाती जास्त विषारी आहेत. त्यामुळे कोणता साप चावला? तो विषारी होता की बिन विषारी हे कळत नाही.
माणूस असो किंवा जनावर चावा घेतलेल्या जागी दोन खोल जखमा दिसल्या तर समजावे की विषारी सापाने चावा घेतला आहे.
तसेच जर साप चावल्याच्या ठिकाणी इंग्रजी यु(U) आकारामध्ये खरचटल्याप्रमाणे जखम झाली असेल आणि रक्तस्राव होत असेल तर समजावे की साप बिनविषारी होता.
जनावरांना शक्यतो सर्पदंश हा तोंडावर, पुढच्या किंवा मागचे पायांवर होतो. तर जनावर चालताना लंगडते व नाक व लघवीतून रक्तस्राव व्हायला सुरुवात होते.
जनावरांला जर नाग चावला असेल तर जनावर थरथरून तोंडातून लाळ टाकते. जनावर दात खाऊन डोळ्यांच्या पापण्यांची उघडझाप बंद करते.
घोणस जातीचा साप जर चावला तर मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव होतो व वेगाने सूज चढते.
मन्यार जातीच्या साप चावल्यास सूज कमी आणि लक्षणेही उशिरा समोर येतात. पण अंतर्गत रक्तस्राव होऊन जनावरांना झटके येतात. जनावरे सारखी उठबस करतात. अशा वेळी वेळ न घालवता पशुवैद्यकीय तज्ज्ञांला बोलावून पटकन उपचार सुरू करावे.