Paddy Harvesting Agrowon
ॲग्रो विशेष

Paddy Harvesting : सिंधुदुर्गात भातपीक कापणी अंतिम टप्प्यात

Paddy Farming : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ६२ हजार हेक्टरपैकी ६० हजार हेक्टरवरील भातपीक कापणी पूर्ण झाली असून पुढील तीन ते चार दिवसांत उर्वरित भातपीक कापणी पूर्ण होण्याची शक्यता आहे.

एकनाथ पवार / ॲग्रोवन वृत्तसेवा

Sindhudurg News : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ६२ हजार हेक्टरपैकी ६० हजार हेक्टरवरील भातपीक कापणी पूर्ण झाली असून पुढील तीन ते चार दिवसांत उर्वरित भातपीक कापणी पूर्ण होण्याची शक्यता आहे. दरम्यान नाचणी पीक वेचणी देखील अंतिम टप्प्यात आहे.

जिल्ह्यात यावर्षी लांबलेल्या पावसामुळे ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत भातपीक कापणीला सुरुवात झाली नव्हती.

त्यानंतर अखेरच्या आठवड्यात पावसाचा जोर कमी झाल्यानंतर भातपीक कापणीला सुरुवात झाली.सायंकाळच्या वेळेत सतत पाऊस पडत असल्यामुळे शेतकऱ्यांना बिनधास्त भातपीक कापणी करता येत नव्हती.

३ नोव्हेंबरनंतर पावसाने पूर्ण विश्रांती घेतली. त्यानंतर पीक कापणीला वेग आला. ३ नोव्हेंबर ते १३ नोव्हेंबरपर्यंत अधिकतर कापणी करण्यात आली. किरकोळ पीक कापणी शिल्लक असताना पुन्हा १४ नोव्हेंबर दरम्यान पावसाने व्यत्यय आणला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Price : बेळगाव जिल्ह्यात ऊसदर कमी; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

Mosambi Crop Disease : अति पाऊस, हवामान बदलामुळे मोसंबीवर रोगाचा प्रकोप

Marathwada Assembly Election : मराठवाड्याच्या तीन जिल्ह्यांतील ४३१ उमेदवारांचे भाग्य ईव्हीएममध्ये बंद

Maharashtra Assembly Election 2024 Voting : राज्यात ६५ टक्के मतदान; सर्वाधिक कोल्हापूर तर सर्वात कमी मुंबईत

Vidarbha Voter Turnout : पश्चिम विदर्भात मतदानाचा टक्का वाढीची शक्यता

SCROLL FOR NEXT