Sugarcane Rate agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Rate : कोल्हापूरनंतर सोलापुरातीलही कारखानदार जादा ऊस घालणाऱ्यास देणार जादा दर

sandeep Shirguppe

Solapur Sugarcane Season : अल् निनोमुळे देशासह अनेक राज्यात पाऊस झाला नसल्याने ऊस क्षेत्र घटण्याची भिती साखर क्षेत्रातील तज्ज्ञांनी बोलून दाखवली होती. दरम्यान महाराष्ट्रात यंदा उसाचे क्षेत्र घटणार असल्याने साखर कारखाने अधिकचा ऊस मिळवण्यासाठी जिल्ह्यातील साखर कारखान्यांमध्ये दराची स्पर्धा सुरू झाली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील तात्यासाहेब कोरे सहकारी साखर कारखान्याने ऊस उत्पादकांना लकी ड्रॉ पद्धतीने बक्षीस योजना जाहीर केली. आपल्या कारखान्याला जास्त ऊस येऊदे या भावनेने सोलापूर जिल्ह्यातही आता ही स्पर्धा पहायला मिळत आहे. जास्त ऊस मिळवण्यासाठी साखर कारखाने बक्षीस जाहीर करीत आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्याच्या गुरसाळे येथील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहनपर बक्षीस योजना जाहीर केली आहे. अशा प्रकारची बक्षीस योजना जाहीर करणारा हा सोलापूर जिल्ह्यातील पहिला साखर कारखाना ठरला आहे. तर खासदार धनंजय महाडिक यांच्या भिमा सहकारी साखर कारखान्याने एफआरपीपेक्षा जादा १२५ रुपये जादा दर देत ऊस उत्पादकांना आकर्षीत करण्याचा प्रयत्न करत आहेत.

सोलापूर जिल्ह्यात रिकव्हरीनुसार साखर कारखान्यांनी २३०० ते २५०० रुपयांच्या आसपास दर जाहीर केला आहे. टेंभुर्णी येथील विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याने २५०० रुपये दर जाहीर करून ऊस दराची कोंडी फोडली आहे. त्यानंतर पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याने जिल्ह्यात सर्वाधिक २५५० रुपये दर जाहीर केला आहे.

दरवर्षी उच्चांकी दर देणाऱ्या श्रीपूर येथील पांडुरंग सहकारी साखर कारखान्याकडून अद्यापही ऊस दराची घोषणा केली नाही. यंदा कारखान्यांचा गाळप हंगाम जेमतेम तीन महिने चालण्याची शक्यता आहे. यामुळे राज्यातील साखर कारखानदार उसाची पळवापळवी करणार असल्याचे आतापासूनच दिसत आहे.

टनाला मिळणार जादा दर

विठ्ठल कारखान्याने शंभर टन ऊसपुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रती टन १० रुपये, अडीचशे टनासाठी १५ रुपये, पाचशे टनासाठी २५ रुपये तर एक हजार टनासाठी ५० रुपये बक्षीस म्हणून अधिकचे देण्यात येणार आहेत. कारखान्याने जाहीर केलेल्या बक्षीस योजनेचे तालुक्यातील शेतकऱ्यांनी स्वागत केले आहे.

दरम्यान, कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील म्हणाले की, या बक्षीस योजनेमुळे कारखान्याला चांगला साखर उतारा मिळणारा ऊस मिळण्यास मदत होणार आहे. त्यामुळे बक्षीस योजनेचा कारखान्याला ऊस मिळवण्यासाठी चांगला‌ फायदा होईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : कांदा दरात काहिशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, कांदा, तसेच काय आहे हरभरा दर?

Maharashtra Rain Alert : राज्यात पावसाचे वाढण्याचा अंदाज; मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज

GIS System : ‘जीआयएस’ देऊ शकते नैसर्गिक आपत्तीची पूर्वसूचना

Red Chilli Farming : लाल मिरचीसाठी प्रसिद्ध वाढोणा बाजार गाव

PM SaurGram : टेकवडी झाले ‘पीएम सौरग्राम’

SCROLL FOR NEXT