Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Protection : ‘एकात्मिक फलोत्पादन’मधून फळबागांचे पुनरुज्जीवन

‘एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान’अंतर्गत २०२३-२४ मध्ये जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन करणे हा घटक राबविण्यात येत आहे.

Dhananjay Sanap

छत्रपती संभाजीनगर ः ‘‘शेतकऱ्यांना जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी आंबा, चिकू, संत्रा व मोसंबी या फळपिकांच्या बागा असलेल्या शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर (mahadbtmahait.gov.in) फलोत्पादन या घटकाखाली अर्ज करावा. अधिक माहितीसाठी कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा,’’ असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख यांनी केले.

‘एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान’अंतर्गत २०२३-२४ मध्ये जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन करणे हा घटक राबविण्यात येत आहे. राज्यामध्ये बऱ्याचशा जुन्या फळबागांची उत्पादकता कमी होत आहे. कारण योग्य मशागत पद्धतीचा अवलंब न करणे, नांग्या न भरणे, खते व औषधांचा योग्य वापर न करणे, झाडांना व्यवस्थित आकार न देणे आदी बाबींमुळे उत्पादकता कमी होत आहे.

जुन्या फळबागांची उत्पादकता वाढविणे या दृष्टीने हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये आंबा, संत्रा, मोसंबी व चिकू या फळपिकांचा समावेश आहे. जुन्या फळबागांच्या पुनरुज्जीवनासाठी प्रकल्प खर्च रक्कम ४० हजार रुपये प्रतिहेक्टर ग्राह्य धरून त्याच्या ५० टक्क्यांप्रमाणे अधिकाधिक रक्कम २० हजार रुपये प्रतिहेक्टर या प्रमाणे अनुदान देय आहे. यामध्ये किमान ०.२० हेक्टर व कमाल २ हेक्टर क्षेत्रासाठी अनुदान देय राहील.

पुनरुज्जीवनासाठी बागांचे किमान, कमाल वय

पीक किमान वय कमाल

वय

आंबा २० ५०

चिकू २५ ५०

संत्रा १० २५

मोसंबी ८ २५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ammonium Sulphate : केंद्र सरकार देणार अमोनियम सल्फेटवर अनुदान; युरियाच्या टंचाईमुळे निर्णय

Crop Loss compensation GR: परभणी, हिंगोलीतील शेतकऱ्यांना दिलासा, रब्बी पेरणीसाठी बियाणे, खते खरेदीसाठी ८३६.३९ कोटी निधी वितरणास मंजुरी

Sugarcane Cultivation: परभणी जिल्ह्यात ऊस लागवडीत ७ हजार ८०९ हेक्टरने वाढ

Unseasonal Rain Paddy Crop Damage: अवकाळी पावसाने भातशेतीचे नुकसान

Paddy Crop Damage: बळीराजाला आर्थिक चणचण

SCROLL FOR NEXT