Kham River Agrowon
ॲग्रो विशेष

River Revival : सतरा ग्रामपंचायतींच्या हद्दीत होणार खाम नदीचे पुनरुज्जीवन

संतोष मुंढे ः ॲग्रोवन वृत्तसेवा

Chhatrapati Sambhajinagar News : जिल्ह्यात शिवना, दुधना व खाम अशा तीन नद्यांचा ‘चला जाणू या नदीला’ या अभियानात समावेश करण्यात आला आहे. या नद्यांच्या क्षेत्रात नदी परिक्रमा, संवाद यात्रा आदी उपक्रम राबविण्यात आले आहेत.

खाम नदी ही छत्रपती संभाजीनगर शहरातून जाते. खाम नदी पुनरुज्जीवन अभियान शहर भागात राबविण्यात आले. आता ते ग्रामीण भागातील १७ ग्रामपंचायतींच्या हद्दीत राबविण्यात येत आहे.

‘चला जाणू या नदीला’ या अभियानाच्या जिल्हा समन्वय समितीची बैठक शुक्रवारी (ता. ५) जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. सामाजिक वनीकरण विभागाच्या विभागीय वनाधिकारी कीर्ती जमदाडे, जिल्हा जलसंधारण अधिकारी य. स, कोंडावळे, जिल्हा खनिकर्म अधिकारी किशोर घोडके, कार्यकारी अभियंता मलनिस्सारण संघा आर.एन. सहा. संचालक आरोग्य डॉ. जितेंद्र डोंगरे, सहा. वनसंरक्षक दादा तौर, शिवना नदी समन्वयक गोकूळ सुरासे, वरिष्ठ भूवैज्ञानिक जीवन बेडवाल तसेच तज्ज्ञ डॉ. पांडे व नरेंद्र चुग हे दूरदृश्‍यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

जिल्हाधिकारी दिलीप स्वामी म्हणाले, की नद्यांशी असलेले नाते दृढ करण्यासाठी हे अभियान आहे. जिल्ह्यात आता भूजल पातळी वाढविण्यासाठी ज्या ज्या गावात उन्हाळ्यात टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागला तेथे विहीर पुनर्भरण, पर्जन्यजल संकलन अभियान राबविण्यात येत आहे.

तसेच वृक्ष लागवडीचेही नियोजन करण्यात आले आहे. याशिवाय मनरेगा, बांबू मिशन, कृषी, वनीकरण, अटल घनवन अशा विविध योजनांचे अभिसरण करून हे अभियान अधिकाधिक लोकाभिमुख करून लोकचळवळ म्हणून राबवावे, असेही ते म्हणाले.

‘चला जाणू या नदीला’ या अभियानाचा उद्देश जनमानसात नदीचे महत्त्व रुजविणे, गावाचे, गावकऱ्यांचे नदीशी असलेले नाते दृढ करणे असा आहे. अधिकाधिक लोक या अभियानाशी जोडले जाणे महत्त्वाचे आहे. हे अभियान हे एक लोकचळवळ झाली पाहिजे.
- दिलीप स्वामी, जिल्हाधिकारी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Haryana Assembly Elections : हरियाणात भाजपची हॅट्रीक हुकणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेस वरचढ; राज्यात झाले ६७ टक्के मतदान

Rainfed Farming Policy : कोरडवाहू शेतीचे शाश्‍वत धोरण कधी?

Interview with Manikrao Khule : ऑक्टोबरमध्ये पाऊस दणका देणार का?

Village Story : खपली

Processing Industry : प्रक्रिया उद्योगाला मिळाली महिलांची साथ

SCROLL FOR NEXT