Maharashtra Rain Forecast: बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र पूरक ठरल्याने राज्यात वादळी वारे, मेघगर्जना आणि विजांसह पावसाची शक्यता आहे. आज (ता. १३) उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे आणि नाशिक जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा अंदाज असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. उत्तर कोकण आणि उत्तर मराठवाड्यातही वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे..मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा राजस्थानच्या जैसलमेरपासून राजगढ, बेतूल, कमी दाबाचे केंद्र ते पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. दक्षिण कोकण आणि लगतच्या अरबी समुद्रात ३.१ ते ७.६ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. दक्षिण कर्नाटकपासून मन्नारच्या आखातापर्यंत कमी दाबाचा पट्टा कायम आहे..शनिवारी (ता. १२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी ३५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर महाबळेश्वर येथे राज्यातील नीचांकी १६.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांत विदर्भाच्या चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपणा येथे सर्वाधिक ८९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. राज्यात ताशी ३० ते ५० किलोमीटर वेगाने वादळी वारे, मेघगर्जना आणि विजांसह जोरदार पाऊस हजेरी लावण्याचा अंदाज आहे..Maharashtra Rain Update: विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाचा अंदाज .आज (ता. १३) नंदुरबार, धुळे आणि नाशिक जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर अतिजोरदार पावसाचा अंदाज असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) देण्यात आला आहे. पालघर, ठाणे, मुंबई, जळगाव, नाशिक, पुणे घाटमाथा, छत्रपती संभाजीनगर, जालना या जिल्ह्यांत विजांसह जोरदार पावसाची, तर रायगड, रत्नागिरी, अहिल्यानगर, पुणे, सातारा, बीड, परभणी, हिंगोली, अकोला, अमरावती या जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे..कमी दाब क्षेत्र विदर्भाकडे येण्याची शक्यताबंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाब क्षेत्र शनिवारी (ता. १२) जमिनीवर आले आहे. ही प्रणाली दक्षिण छत्तीसगड आणि परिसरावर असून, त्याला लागून समुद्र सपाटीपासून ७.६ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. आज (ता. १३) हे कमी दाबाचे क्षेत्र दक्षिण छत्तीसगड आणि विदर्भाकडे येण्याची शक्यता आहे..शनिवारी (ता. १२) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) :ठिकाणे---तापमान कमाल---तापमान किमानपुणे---३१.७---२१.१अहिल्यानगर---३४.२---२३.३धुळे---३४.६---१९.६जेऊर---३४.५---२२कोल्हापूर---३१.६---२२महाबळेश्वर---२३.१---१६.५मालेगाव---३३.८---२२.६नाशिक---३०.४---२२.Maharashtra Monsoon: राज्यात दोन दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता.निफाड---३२.४---२१.८सांगली---३३.५---२१.८सातारा---३१.३---२०.२सोलापूर---३५---२५.३सांताक्रूझ---३१.५---२५.७डहाणू---३२.५---२५रत्नागिरी---३२.५---२४.८.छत्रपती संभाजीनगर---३३.५---२३.५धाराशिव---३३---२१.४परभणी---३३.८---२३.५अकोला---३३.७---२४अमरावती---३२.२---२२.८ब्रह्मपूरी---३१.५---२४बुलडाणा---३२.२---२१.८.चंद्रपूर---३०.८---२४.४गडचिरोली---२९--२३.२गोंदिया---३१.८---२१नागपूर---३२.६---२४.२वर्धा---३३.२---२४.२वाशीम---३४.४---२१.२यवतमाळ---३१.२---१६.६.सरासरी तापमान (अंश से.)विभाग---किमान---कमालउत्तर महाराष्ट्र---१९.६---३४.६पश्चिम महाराष्ट्र---१६.५---३५कोकण---२४.८--३२.५मराठवाडा---२१.४---३३.८विदर्भ---१६.६---३४.४.अतिजोरदार पावसाची शक्यता (ऑरेंज अलर्ट) : नंदुरबार, धुळे, नाशिक घाटमाथा.जोरदार पावसाची शक्यता (येलो अलर्ट) : पालघर, ठाणे, मुंबई, जळगाव, नाशिक, पुणे घाटमाथा, छत्रपती संभाजीनगर, जालना.विजांसह पावसाची शक्यता (येलो अलर्ट) : रायगड, रत्नागिरी, अहिल्यानगर, पुणे, सातारा, बीड, परभणी, हिंगोली, अकोला, अमरावती..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.