Parbhani News : जिल्हा प्रशासनाकडून यंदाच्या (२०२४-२५) खरीप पिकांची सुधारित हंगामी पैसेवारी गुरुवारी (ता. ३१) जाहीर करण्यात आली आहे. परभणी जिल्ह्याची सुधारित हंगामी पैसवारी सरासरी ४७.३० पैसे तर हिंगोली जिल्ह्याची सुधारित हंगामी पैसेवारी ४८.२८ पैसे आली आहे.
परभणी जिल्ह्यातील ८३३ आणि हिंगोली जिल्ह्यातील ७०६ गावे मिळून दोन जिल्ह्यातील एकूण १ हजार ५३९ गावांची खरीप पिकांची सुधारित हंगामी पैसेवारी ५० पैसेच्या आत आली आहे. परभणी जिल्ह्यातील पैसेवारी लागू असलेल्या सर्व ८३३ गावातील लागवडीयोग्य क्षेत्र ५ लाख ७० हजार ४३ हेक्टर आहे.
या गावातील यंदाच्या (२०२४) खरीप हंगामातील पेरणी क्षेत्र ५ लाख ३१ हजार ८५१ हेक्टर तर पडीक क्षेत्र ३८ हजार १९२ हेक्टर आहे. या सर्व गावांची यंदाच्या खरिपाची सुधारित हंगामी पैसवारी ४७.३० पैसे आली आहे.
यंदा ३० सप्टेंबर रोजी जाहीर केलेली परभणी जिल्ह्याची सरासरी हंगामी (नजर अंदाज) पैसेवारी ४७.३२ पैसे आली होती. हिंगोली जिल्ह्यात खरिपाची ६६८ आणि रब्बीची ३८ मिळून ७०६ गावे आहेत.
या गावातील लागवडीयोग्य क्षेत्र ४ लाख ३ हजार ६३८ हेक्टर आहे. या गावातील यंदाच्या (२०२४) खरीप हंगामातील पेरणी क्षेत्र ३ लाख ८२ हजार ६०९ हेक्टर तर पडीक क्षेत्र ३५ हजार ६७७ हेक्टर आहे. जिल्ह्याची सुधारित हंगामी पैसेवारी सरासरी ४८.२८ पैसे आली आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.